वाल्मिक कराडने केली सर्वात मोठी मागणी!

On: January 3, 2025 12:06 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी घडली होती. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड कनेक्शन असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण आला. अशातच वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर केल्यानंतर 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता कोठडीत असताना वाल्मिक कराडने एक मोठी मागणी केली आहे.

वाल्मिक कराडला कोणता आजार? :

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने केज न्यायालयाकडे आजारपणामुळे 24 तास मदतनीस मिळावा यासाठी दाद मागितली आहे. मात्र आता त्याला काय आजार आहे? व त्याची न्यायपालिककडे काय विनंती आहे असा सर्वांचा प्रश्न पडला आहे.

मात्र आता नुकतीच वाल्मिक कराडने केज न्यायालयात धाव घेतली आहे. कारण स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराड याने केला आहे. तसेच ऑक्सिजन मशीन त्यासाठी दररोज लावण्याची गरज आहे. कारण या आजारात ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावण्यात येते. मात्र ते चालवण्यासाठी एक मदतनीस 24 तास आवश्यक असल्याने, हा असिस्टंट आपल्याला देण्यात यावा अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे.

Walmik Karad l वर्षाच्या अखेरच्या दिवशी वाल्मिक कराड शरण आला :

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र ही क्रूर हत्या वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावरूनच करण्यात आल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. तसेच आता या प्रकरणी सुरुवातीला चालढकल करणाऱ्या पोलिसांवर देखील मोठा दबाव आला. मात्र त्यानंतर वाल्मिक कराड 20 ते 22 दिवसांनी समोर आला आहे.

31 डिसेंबरला 2024 ला पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात तो दाखल झाला आहे. मात्र आता त्याला अटक करून केज न्यायालयासमोर उशीरा रात्री दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

News Title – Walmik Karad Big Demand said he needed assistance

महत्त्वाच्या बातम्या-

आज छगन भुजबळ-शरद पवार एकत्र येणार; यामागचं कारण काय?

वाल्मिक कराड शरण आला ‘त्या’ गाडीबाबत धक्कादायक दावा समोर!

नववर्षात ग्राहकांना झटका, सोन्याची पुन्हा मोठी भरारी; बघा आजचे लेटेस्ट दर

लाडक्या बहीणींना सरकारचा धक्का, ‘ही’ एक चूक अन् तुमचा अर्ज होणार बाद

नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now