जेल की बेल?, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

On: January 18, 2025 10:31 AM
Walmik Karad Bail
---Advertisement---

Walmik Karad | बीडमधील (Beed) मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) राज्यभर गाजत आहे. या प्रकरणातील आरोपींना (Accused) पोलिसांनी अटक केली असली तरी, कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा आरोपी अद्याप फरार (Absconding) आहे. तसेच, यामध्ये खंडणी प्रकरणातील (Extortion Case) आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून (Opposition) केला जात आहे.  (Walmik Karad)

दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत (MCOCA) कारवाई करत त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात (Kej District and Sessions Court) सुनावणी होणार आहे.

वाल्मिक कराडच्या जामिनासाठी अर्ज; CID कडून विरोध

वाल्मिक कराडला (Walmik Karad) खंडणीच्या गुन्ह्यात केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर, कराडच्या वकिलाने (Lawyer) लगेच जामिनासाठी अर्ज (Application) केला होता. या अर्जाला सीआयडीकडून (CID) न्यायालयात आव्हान (Challenge) देण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या कराडची सीआयडीला चौकशी (Inquiry) करायची असल्याने त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कराड समर्थकांचे राज्यभर आंदोलन

दरम्यान, वाल्मिक कराडवर (Walmik Karad) मंगळवारी मकोका लावण्यात आल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कराडवर मकोका दाखल होताच समर्थकांकडून परळी (Parli) बंदची हाक (Call) देण्यात आली. तसेच, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने (Protests) करण्यात आली. काल (दि. १८) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगाव (Rajegaon) येथे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ एका व्यक्तीने पाण्याच्या टाकीवर (Water Tank) चढून आंदोलन केले.

भगवान चौरे (Bhagwan Chaure) असे या व्यक्तीचे नाव आहे. कराडला जाणूनबुजून गोवले जात असून या प्रकरणाची योग्य रीतीने चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

Title : Walmik Karad bail hearing today in Santosh Deshmukh murder case

महत्वाच्या बातम्या- 

टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

सैफवरील हल्ल्यावर बोलताना अभिनेत्रीने दाखवलं हिऱ्याचं घड्याळ, नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

‘त्या 700 फायली गायब’; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर

शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का; भाजपची नवी खेळी

सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now