Walmik Karad | संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या आणि खंडणीप्रकरणी मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर (Valmik Karad) बीड जिल्हा कारागृहात हल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. तुरुंगातच अन्य आरोपींसोबत झालेल्या वादातून ही हाणामारी झाली असल्याची माहिती मिळत आहे.
हत्या प्रकरणातील आरोपीवर तुरुंगातच हल्ला
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपात अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) सध्या बीड येथील कारागृहात बंदिस्त आहे. मकोका कायद्यान्वये अटक झालेला सुदर्शन घुले हा आरोपीही त्याच तुरुंगात आहे. याच गुन्ह्यातील काही इतर आरोपीसुद्धा कारागृहातच असल्याचे समजते.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, अक्षय आठवले नावाचा आणखी एक मकोका अंतर्गत अटक केलेला आरोपी बाजूच्या बॅरेकमध्ये आहे. तर परळीतील महादेव गीते याच्यावरही गंभीर आरोप असून त्याचेही नाव या हल्ल्यात समोर आले आहे. या दोघांनी मिळून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर अचानक हल्ला चढवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जेलमध्ये वाद, बाचाबाचीतून हाणामारी
तुरुंगात सुरूवातीला (Walmik Karad) आरोपींमध्ये वादावादी झाली आणि त्याचेच रूपांतर पुढे हाणामारीत झाल्याचे कारागृहातील सूत्रांनी सांगितले. हल्ल्याची वेळ आणि नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झाली नसली तरी हा प्रकार नियोजनबद्ध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा तक्रार अद्याप समोर आलेली नाही. मात्र एका गटातील आरोपींवर दुसऱ्या गटाने हल्ला केल्याने कारागृहातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे.






