“बाबा तुम्हाला निरोप…”, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या मुलीची भावूक पोस्ट व्हायरल!

On: June 20, 2025 12:32 PM
mrunmayee lagoo
---Advertisement---

Mrunmayee Lagoo | ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek Lagoo) यांचे गुरुवारी, १९ जून रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या शिस्तप्रिय अभिनयाने ओळख निर्माण करणाऱ्या या कलाकाराच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या आणि प्रसिद्ध लेखिका मृण्मयी लागू (Mrunmayee Lagoo) यांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

लेकीची वडिलांसाठी भावनिक पोस्ट-

वडिलांच्या निधनानंतर मृण्मयीने (Mrunmayee Lagoo) सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “आपण बराच काळ एकत्र लढलो, पण आता कृतज्ञता आणि प्रेमाने तुम्हाला निरोप देण्याची वेळ आली आहे. माझे बाबा! माझे बेस्ट फ्रेंड, माझे मार्गदर्शक, माझे एक नंबरचे फॅन आणि माझ्या डोक्यातील आवाज.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

आपल्या वडिलांसोबतच्या नात्याचे विविध पैलू उलगडत मृण्मयीने पुढे लिहिलं, “मला तुमची आठवण येईल. तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात.” त्यांच्या या पोस्टमधून वडील आणि मुलीमधील एक घट्ट आणि मैत्रीपूर्ण नात्याचे दर्शन घडते, ज्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले.

मैत्रीपूर्ण संबंध आणि कलाक्षेत्रातील वारसा-

विवेक लागू हे ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. लग्नानंतर काही काळाने विभक्त झाले असले तरी, त्या दोघांमध्ये अखेरपर्यंत मैत्रीचे संबंध कायम होते. रीमा लागू यांचे १८ मे २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले होते, जो कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता.

विवेक आणि रीमा यांची कन्या मृण्मयी यांनी आपल्या आई-वडिलांचा कलाक्षेत्रातील वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये एक लेखिका म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘छपाक’ (Chhapaak) आणि ‘थप्पड’ (Thappad) यांसारख्या गाजलेल्या आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटांचे लेखन मृणयी यांनी केले आहे.

News Title – Vivek Lagoo Remembered by Daughter Mrunmayee

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now