‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन

On: January 17, 2025 11:56 AM
Vishnu Rajoria Announces 1 Lakh Reward for Brahmin Couples Having Four Children
---Advertisement---

Vishnu Rajoria | मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांनी ब्राह्मण समाजाला चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत एक वादग्रस्त विधान केले आहे. चार मुले जन्माला घालणाऱ्या तरुण ब्राह्मण जोडप्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या घोषणेमुळे वाद निर्माण झाला असून लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे विधान असल्याचे बोलले जात आहे. (Vishnu Rajoria )

विष्णू राजोरिया यांची वादग्रस्त घोषणा

मध्य प्रदेशातील परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया (Vishnu Rajoria ) यांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. “देशात धर्मांधांची संख्या वाढत आहे कारण आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंब वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे बंद केले आहे,” असे राजोरिया म्हणाले. “भावी पिढ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. आजची तरुणाई सेटल होऊन एक मूल जन्माला घालतात व कुटुंब वाढवण्याचे बंद करतात. हे अत्यंत चिंताजनक आहे.” असेही ते म्हणाले.

तरुणांना चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन

राजोरिया (Vishnu Rajoria ) यांनी तरुणांना किमान चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. “तुम्हाला किमान चार मुलं असावीत, असा माझा आग्रह आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, चार मुले असलेल्या जोडप्यांना परशुराम मंडळ एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “ते मंडळाचे अध्यक्ष राहतील किंवा नसतील, हा पुरस्कार दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजोरिया पुढे म्हणाले की, “आता शिक्षण खूप महाग झाले आहे, असे तरुण वारंवार सांगतात. याबाबत ते म्हणाले की, तुम्ही कसेही रहात असाल तरी मुले होण्यात मागे राहू नका. तसे न केल्यास धर्मद्रोही या देशाचा ताबा घेतील.” त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसंख्या नियंत्रण धोरणांच्या विरोधातील विधान

राजोरिया यांचे हे विधान केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणांच्या विरोधात आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवत असताना आणि कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहन देत असताना, एका कॅबिनेट मंत्र्याने अशा प्रकारे लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन करणे हे आश्चर्यकारक आणि तितकेच वादग्रस्त आहे.

Title: Vishnu Rajoria Announces 1 Lakh Reward for Brahmin Couples Having Four Children

महत्वाच्या बातम्या- 

शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला

‘हातात लांब ब्लेड होता, तो जेहबाबाकडे जाऊ लागला’; केअरटेकरने सांगितला हल्ल्याचा थरार

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

‘मी खूप रडले….’; ‘त्या’ व्हायरल किसींग सीनबाबत प्रिया बापट पहिल्यांदाच बोलली

हवामानात मोठा बदल होणार, IMD ने दिली महत्त्वाची माहिती

Join WhatsApp Group

Join Now