विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली

On: January 4, 2025 11:07 AM
Vishnu Chate Big Claim About Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, खून आणि पवनचक्की व्यवस्थापनाला दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणात सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. गेल्या 22 दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशात दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात आरोपी असलेला विष्णू चाटे याने तोंड उघडत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने वाल्मिक कराडबाबत (Walmik Karad) मोठी कबुली दिली आहे.

पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात 11 डिसेंबर 2023 रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे तिघे आरोपी आहेत.

यातील आरोपी विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली होती. त्याने अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधला होता, अशी कबुली चाटे याने चौकशी दरम्यान दिली आहे. सीआयडीने याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात हा खुलासा समोर आलाय.

खंडणीचे प्रकरण काय आहे?

पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी 2023 मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले यांची नावे आहेत. या तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कराडच्या सुनावणीवेळी चाटेचा कबुलीजबाब सीआयडीने अहवालात नमूद केलाय.यामध्ये चाटे यानेच कराडचे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्याची कबुली दिली असल्याचं समोर आलंय.

आता या कबुलीजबाबाच्या अनुषंगाने पोलीस कराडकडे या सर्व गुन्ह्यांबाबत तपास करतील.तसेच, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खूनप्रकरणात त्याचा काय सहभाग आहे? या अनुषंगाने देखील तपास केला जाणार आहे. विष्णू चाटेच्या या कबुलीमुळे आता वाल्मिक कराड आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

परभणीत आज मुकमोर्चा

दरम्यान, सरपंच हत्ये प्रकरणी आज 4 जानेवारीरोजी परभणीत (Parbhani Muk Morcha) सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी तसेच भाऊ धनंजय देशमुख, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. (Walmik Karad)

News Title – Vishnu Chate Big Claim About Walmik Karad

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

“हिंदीच बोलायचं, मराठीत बोलला तर…”; पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला, नेमकं काय घडलं?

शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार

Join WhatsApp Group

Join Now