विराट, रोहित आले पुन्हा एकत्र! रोहितने केला विराटला सल्युट

On: October 16, 2025 7:06 PM
Virat-Rohit
---Advertisement---

Virat-Rohit । लवकरच भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका आणि T-२० मालिका सुरु होणार आहे आणि यामुळे भारतात क्रिकेटप्रेमी आनंदात आहे. यासंदर्भात जवळपास ४ महिन्यांनी विराट कोहोली (Virat Kohli) भारतात आला आहेत. तसेच बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहोलीची झळक प्रेक्षकांना मिळाली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा व्हिडीओ व्हायरल :

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच टक्करचा सामना होतो. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट युद्ध नवीन नाहीये. त्यात रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) यांचे ऑस्ट्रेलिया सोबत विशेष नाते आहे. २०२३ मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरलो होतो.

२०२४ च्या T-२० विश्व चषकात देखील भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सामने अटीतटीचे झाले होते आणि आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना खेळताना दिसणार आहे. दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Virat-Rohit | काय आहे व्हिडीओमध्ये? :

भारतीय संघ सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले, त्यावेळी दिल्ली विमानतळावर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या रोहित शर्मा विराट कोहलीला सल्युट करतांना दिसत आहे.

विराट कोहली आधीच बसमध्ये बसलेले होते आणि रोहित शर्माने येताना विराट कोहलीला पाहिले आणि त्याने विराट कोहलीला सल्युट केले. पुढे शुभमन गिल (shubhman gill) देखील विराट कोहलीला भेटताना दिसला. हा व्हिडीओ पाहुन क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लहर पाहायला मिळाली.

Title – Rohit Sharma and Virat Kohli meets before ODI 

Join WhatsApp Group

Join Now