Virat Kohli Post | भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिकेसाठी दाखल झाला असून, या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 2027 च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका निर्णायक ठरणार आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उतरणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
मात्र या मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान त्याने एक पोस्ट करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. एका वाक्यात त्याने आपल्या निर्धार आणि मानसिकतेबद्दल स्पष्ट संदेश दिला आहे.
“तुम्ही तेव्हाच अपयशी ठरता, जेव्हा तुम्ही हार मानता” — कोहलीचा संकेतपूर्ण संदेश :
ऑस्ट्रेलियात पोहोचताच विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली. “तुम्ही तेव्हाच अपयशी ठरता, जेव्हा तुम्ही खरोखर हार मानण्याचा निर्णय घेता.” या एका वाक्यानेच कोहलीने आपल्या चाहत्यांना आणि समीक्षकांना प्रत्युत्तर दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. निवृत्तीच्या चर्चांदरम्यान त्याचा हा आत्मविश्वास आणि जिद्द पुन्हा एकदा चाहत्यांना प्रेरणा देणारी ठरली आहे.
The only time you truly fail, is when you decide to give up.
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2025
कोहलीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले, तर काहींनी त्याला ‘कधीही हार न मानणारा योद्धा’ असं संबोधलं आहे.
Virat Kohli Post | ऑस्ट्रेलियातील कामगिरी प्रभावी – निर्णायक मालिकेत रोहित-कोहलीकडून अपेक्षा :
ऑस्ट्रेलियात कोहलीचा विक्रम प्रभावी आहे. 2009 पासून त्याने तिथे एकूण 29 वनडे सामने खेळले असून, 51.03 च्या सरासरीने 1,327 धावा केल्या आहेत. यात 5 शतके आणि 6 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघाला विजय मिळवण्यात नेहमीच फायदा झाला आहे. (Virat Kohli Post)
ही मालिका कोहली आणि रोहितसाठी निर्णायक मानली जात आहे. त्यांनी टेस्ट आणि टी20 स्वरूपातून निवृत्ती घेतली असून आता वनडे फॉरमॅटवरच लक्ष केंद्रीत केले आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले आहे की 2027 विश्वचषकाच्या निवड प्रक्रियेत फक्त कामगिरीलाच महत्त्व दिलं जाईल.
पर्थमध्ये होणार पहिला सामना – चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर (Optus Stadium) खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी होईल.
क्रिकेटविश्वाचं लक्ष आता या मालिकेकडे लागलं असून, विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे, तर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा “किंग कोहली” चा जलवा पाहण्याची आस निर्माण झाली आहे.






