कुबड्या घेऊन लंगडणारा द्रविड दिसताच विराटने केलं जे, त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

On: April 14, 2025 3:29 PM
Kohli Rahul Dravid video
---Advertisement---

Kohli Rahul Dravid video l आयपीएल 2025 मध्ये विराट कोहलीने केवळ मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेरही आपली संवेदनशीलता आणि आदरभावना दाखवली आहे. रॉयल चॅलेंजर्सने राजस्थान रॉयल्सवर मिळवलेल्या भव्य विजयानंतर, मैदानावर एक भावनिक क्षण घडला जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राजस्थानच्या प्रशिक्षकपदी असलेले राहुल द्रविड (Rahul dravid) दुखापतीमुळे कुबड्यांवर अवलंबून आहेत. सामना संपल्यानंतर, विराट कोहलीने जे काही केलं त्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. द्रविडप्रती त्याने दाखवलेला आदर आणि आपुलकी क्रिकेटप्रेमींना भावून गेला आहे.

“राहुल भाई, तुम्ही तिथेच थांबा…” विराटचं मन जिंकणारं वागणं :

सामना जिंकल्यावर विराट कोहली मैदानाबाहेर जात असताना त्याने पाहिलं की, कुबड्या घेऊन राहुल द्रविड लंगडत मैदानात येत होते. हे पाहताच विराट थांबला, मागे फिरला आणि राहुल द्रविडकडे गेला. त्याने नम्रपणे सांगितले, “राहुल भाई, तुम्ही पुढे जाऊ नका. खेळाडू तुमच्यापर्यंतच येतील हस्तांदोलन करायला.” (Kohli Rahul Dravid video)

विराटने हा सल्ला राहुलच्या तब्येतीची काळजी घेत दिला होता. मात्र, राहुल द्रविड आपल्या संयमित वृत्तीप्रमाणेच हळूहळू पुढे जात राहिला आणि एकामागोमाग एक RCB खेळाडूंचं अभिनंदन करत राहिला. विराटने दाखवलेला हा क्षण सध्या भावनांचे क्षणचित्र बनला आहे.

Kohli Rahul Dravid video l विराटचं मैदानावर वर्चस्व, मैदानाबाहेर आदरभाव :

या सामन्यात विराट कोहलीने 45 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी करत बंगळुरुला सहज विजय मिळवून दिला. 174 धावांचा पाठलाग करताना त्याने फिलीप सॉल्टसोबत अर्धशतकाची भागीदारी करत सामना 15 चेंडू आधी जिंकला. (Kohli Rahul Dravid video)

मात्र सोशल मीडियावर कौतुक होत आहे ते विराटच्या द्रविडप्रती असलेल्या आदराचं. अनेकजण म्हणतात की, “आज विराटने फक्त सामना नाही जिंकला, तर लाखो मनंही जिंकली आहेत.”

राहुल द्रविड व्हिलचेअरवर का? :

राहुल द्रविड कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका स्थानिक सामन्यात विजया क्रिकेट क्लबकडून खेळताना जखमी झाला होता. त्यामुळे सध्या तो व्हिलचेअर आणि कुबड्यांवर असूनही आपल्या कर्तव्य बजावत आहे. IPL 2025 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससोबत प्रशिक्षक म्हणून करार केला आहे.

News Title: Virat Kohli Stops Rahul Dravid with Crutches – Heartwarming Gesture Goes Viral After RCB Match

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now