Virat Kohli l आयपीएल 2025 च्या 20व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात झालेला सामना अनेक दृष्टीने संस्मरणीय ठरला. या सामन्यात विराट कोहलीने फॉर्मातले उत्तम पुनरागमन करत 42 चेंडूत 67 धावांची खेळी करत RCBच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचा एक षटकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे – तो म्हणजे जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर मारलेला ‘छक्का’!
बुमराहचा कमबॅक, पण कोहलीची बाजी :
जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच मैदानात पाऊल ठेवलं. सामना सुरू झाल्यावर तिसऱ्या षटकात पडिक्कल आणि कोहलीने मिळून 16 धावा काढल्या आणि गोलंदाजीत बदल करत बुमराहला चेंडू सोपवण्यात आला. पडिक्कलने एक धाव काढून विराटला स्ट्राईक दिला आणि त्याच क्षणी कोहलीने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर भक्कम षटकार ठोकला.
Virat Kohli hits Jasprit Bumrah for a SIX!
It’s all happening at Wankhede! #MIvRCB pic.twitter.com/VADDzw5Sfw
— Sameer Allana (@HitmanCricket) April 7, 2025
हा षटकार म्हणजे केवळ एक शॉट नव्हता, तर कोहलीच्या आत्मविश्वासाचं आणि क्लासचं दर्शन घडवणारा क्षण होता. जसप्रीत बुमराहसारख्या भारताच्या स्टार गोलंदाजाविरुद्ध पहिल्याच चेंडूवर असा षटकार मारणं, ही बाब चाहत्यांना भुरळ घालणारी ठरली आणि काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Virat Kohli l कोहलीने रचला टी-20 क्रिकेटमधील विक्रम :
या षटकारासह विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावांचा टप्पा पार केला. तो हा पराक्रम करणारा जगातील पाचवा खेळाडू, तर भारताकडून तो एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याच्या या विक्रमी खेळीने RCBला 221 धावांपर्यंत मजल मारायला मदत झाली.
या सामन्यात RCBने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत करत 10 वर्षांनंतर वानखेडे स्टेडियमवर विजयाची चव चाखली. कोहलीसोबत रजत पाटीदारनेही 64 धावांची अर्धशतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.






