Virat Kohli Retirement | विराट कोहली हा भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू असून, गेल्या काही हंगामांपासून तो रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू संघाचा चेहरा बनला आहे. मात्र आयपीएल 2026 हंगामापूर्वीच त्याच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोहलीने RCB संघासोबतचा करार नूतनीकरण न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Virat Kohli Retirement)
करार नूतनीकरणाला नकार, निवृत्तीच्या चर्चेला उधाण :
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने आरसीबीसोबतचा करार नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता तो आयपीएलमधून (IPL) निवृत्ती घेणार का, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींमध्ये उपस्थित झाला आहे. इतकंच नाही तर कोहलीने भविष्यात त्याचं नाव किंवा चेहरा वापरू नये, असंही फ्रँचायझीला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
आरसीबी आणि विराट कोहलीचं नातं गेली अनेक वर्षं घट्ट राहिलं आहे. संघाने गेल्या हंगामात आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती आणि त्यात कोहलीचं योगदान मोलाचं होतं. पण आता कोहलीने करार नूतनीकरणास नकार दिल्याने फ्रँचायझीसमोर नवीन रणनीती आखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. (Virat Kohli Retirement)
Virat Kohli Retirement | चाहत्यांमध्ये संभ्रम आणि प्रतीक्षा :
कोहलीच्या निर्णयानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो फक्त ब्रेक घेतोय की कायमचा निरोप देतोय, याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेलं नाही.
कोहली किंवा आरसीबीने या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






