टीम इंडियाला धक्का! विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?

On: May 10, 2025 10:47 AM
Virat Kohli Test Retirement
---Advertisement---

Virat Kohli Test Retirement | भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर विराट कोहलीदेखील (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे समजते. अहवालानुसार, विराट कोहलीने BCCIला इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्तीची माहिती दिली आहे. मात्र, बोर्डाने त्याला निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. (Virat Kohli Test Retirement)

कोहलीच्या निवृत्तीची शक्यता का वाढली? :

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर विराटच्या फलंदाजीत मोठी घसरण झाली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याचा फॉर्म सुमार राहिला आणि त्याच्यावर टीकाही झाली.

त्यामुळे कोहली गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीबाबत विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. (Virat Kohli Test Retirement)

Virat Kohli Test Retirement | BCCIने मागितला पुनर्विचार :

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोट्यांच्या मालिकेसाठी संघ निवड लवकरच होणार आहे. मात्र, जर रोहित आणि विराट दोघेही अनुपलब्ध असतील, तर नवीन कसोटी कर्णधाराची निवड ही निवड समितीसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. अजिंक्य रहाणे, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांची नावे चर्चेत आहेत. (Virat Kohli Test Retirement)

सूत्रांच्या माहितीनुसार, विराटने आपली इच्छा BCCIला कळवली आहे, पण BCCIने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी अंतिम निर्णय थांबवण्याची विनंती केली आहे. सध्या विराटने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.

News Title: Virat Kohli Likely to Retire from Test Cricket After Rohit Sharma; BCCI Requests Reconsideration

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now