Virat Kohli l रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना बोटाला दुखापत झाली. सामन्यादरम्यान डीप मिड-विकेटवर फिल्डिंग करताना सीमारेषेवर चौकार अडवताना त्याच्या हाताला बॉल लागला आणि तो जोरात ओरडला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली की काय, याची चिंता चाहत्यांना वाटू लागली होती. (virat Kohli)
या घटनेनंतर विराट कोहलीने मैदान सोडले नाही आणि फिल्डिंग सुरूच ठेवली. मात्र, सामन्यानंतर त्याची स्थिती काय आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी सर्वांचे लक्ष आरसीबीच्या कोच अँडी फ्लॉवर यांच्या वक्तव्याकडे लागले होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषदेत विराटच्या तब्येतीबाबत अपडेट दिले.
कोहलीच्या दुखापतीवर कोच अँडी फ्लॉवर यांचे स्पष्टीकरण :
अँडी फ्लॉवर म्हणाले, “विराट सध्या बरा वाटतोय, तो बरा आहे.” या वक्तव्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, पुढील सामन्यांमध्ये तो खेळणार की विश्रांती घेणार, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. विराट गुजरातविरुद्धच्या सामन्यात फक्त ७ धावा करून बाद झाला होता. (virat Kohli)
दुसरीकडे, सामना एकतर्फी ठरला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर ८ विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्स गमावून १६९ धावा केल्या होत्या, पण गुजरातने केवळ १७.५ षटकांत २ विकेट्स गमावून १७० धावा करत सहज विजय मिळवला. (IPL 2025)
Virat Kohli l चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी :
विराट कोहलीच्या दुखापतीमुळे पुढील सामन्यातून त्याला वगळण्यात येईल की नाही, यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सध्या तरी त्याची प्रकृती स्थिर आहे आणि मोठ्या प्रकारची दुखापत झालेली नसल्याचं अँडी फ्लॉवर यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील सराव सत्रांनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. (virat Kohli)
विराट कोहलीप्रमाणेच RCB संघासाठीही हा दिलासादायक अपडेट आहे. कारण संघ आधीच पराभवाच्या मालिकेतून जात आहे आणि विराटसारख्या अनुभवी फलंदाजाची गरज संघाला आहेच. आता विराट पुढील सामन्यात दिसणार की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






