विराटचा रौद्र अवतार! कॅच सोडल्याने टोपी जमिनीवर फेकली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

On: April 8, 2025 9:35 AM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 l आयपीएलच्या रोमहर्षक सामन्यात वानखेडे स्टेडियमवर सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) तब्बल 10 वर्षांनी मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर मात दिली. मात्र या सामन्यातील एक प्रसंग सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला – तो म्हणजे विराट कोहलीचा संताप! एका झेलाच्या गोंधळामुळे विराट (Virat Kohali Angry) एवढा चिडला की त्याने चक्क आपली टोपी डोक्यावरून काढून जमिनीवर फेकली.

सामन्याच्या १२व्या षटकात सूर्यकुमार यादवने बॉल हवेत उंच मारला. तो झेल घेता येण्यासारखा होता. पण विकेटकीपर जितेश शर्मा आणि गोलंदाज यश दयाल दोघेही एकाच बॉलसाठी धावत गेले आणि दोघांमध्ये जोरदार धडक झाली. यामुळे यशच्या हातात स्थिरावलेला बॉल सुटून जमिनीवर पडला. (IPL 2025)

नक्की काय घडलं? :

सूर्यकुमार यादव त्या क्षणी २७ धावांवर खेळत होता. त्याने मारलेला फटका बॅटच्या एजला लागून हवेत उंच गेला. विकेटकीपर जितेश शर्मा आणि यश दयाल दोघेही बॉलकडे धावत गेले, पण एकमेकांशी संवाद न झाल्यामुळे पीचच्या मध्यभागी जोरदार धडक झाली. यशच्या हातात बॉल आला होता, पण जितेशच्या धडकेने तो सुटला.

धडकेनंतर दोघेही काही वेळ मैदानावर पडलेले होते. फिजिओनी दोघांची तपासणी केल्यानंतर दोघेही खेळण्यासाठी फिट असल्याचं सांगितलं. मात्र हा कॅच सुटल्याने विराट कोहली चांगलाच भडकला. त्याने मैदानावर अपशब्द वापरत संताप व्यक्त केला आणि आपली टोपी जोरात जमिनीवर फेकली. (virat kohli viral video)

IPL 2025 l गावसकरांचा सल्ला आणि व्हिडीओ व्हायरल :

या प्रसंगावर कॉमेंट्री बॉक्समधून सुनील गावसकर यांनीही नाराजी व्यक्त केली. “अशा प्रसंगी कोण जाणार ते आधीच ठरलेलं पाहिजे, हे प्रशिक्षकांनी खेळाडूंना शिकवायला हवं,” असं ते म्हणाले. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर “VIRAT ANGRY” या हॅशटॅगने व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

सामन्यात आरसीबीने (RCB win) शेवटी विजय मिळवला असला तरी हा झेल सुटला असता तर सामना हातातून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे हा प्रसंग अजूनही चर्चेत आहे. अनेकांनी विराटच्या भावना समजून घेतल्या तर काहींनी त्याच्या संतापाच्या पद्धतीवर टीका केली आहे.

News Title: Virat Kohli Furious After Catch Dropped Due to Bowler-Keeper Collision; Video Goes Viral

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now