Virat Kohli chocolate | भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) केवळ त्याच्या बॅटिंगसाठीच नाही तर फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. मैदानावर झपाट्याने धावणारा आणि प्रत्येक चेंडूला प्रतिसाद देणारा कोहली अनेकदा सामन्यादरम्यान एक खास चॉकलेट खाताना दिसतो. नेमकं हे चॉकलेट कोणतं आहे, यामागचं रहस्य काय आहे हे आपण पाहणार आहोत.
एनर्जीचा गुपित फॉर्म्युला!
विराट कोहली (Virat Kohli chocolate) जे चॉकलेट खातो ते जेलीच्या स्वरूपात असतं आणि त्यामध्ये कॅफिन व कार्बोहायड्रेट्सचा समावेश असतो. हे चॉकलेट थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी उपयोगी ठरतं. विशेष म्हणजे हे चॉकलेट लंडनमधील एका ब्रँडचं असून भारतात सहा पीसच्या एका पॅकची किंमत तब्बल ₹5,000 आहे.
सामन्यादरम्यान अनेक वेळा कोहलीला थकवा जाणवतो, तेव्हा तो हे चॉकलेट खातो. हे केवळ चवदार नाही तर ऊर्जा पुनर्प्राप्तीमध्ये उपयुक्त असल्यामुळे फिटनेससाठी सजग असलेल्या कोहलीच्या डाएटचा महत्त्वाचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार या चॉकलेटचं वजन सुमारे 100 ग्रॅम असून ते ऑनलाइन पोर्टल्सवर उपलब्ध आहे.
Virat Kohli chocolate | विराटला डार्क चॉकलेटही प्रिय :
या चॉकलेटची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली आहे. विशेषतः एका IPL सामन्यादरम्यान विराटच्या हातात हे चॉकलेट दिसल्यावर लोकांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. (Virat Kohli chocolate)
कोहलीचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, विराटला डार्क चॉकलेट विशेष आवडतं. मात्र तो नेहमी एनर्जेटिक आणि पोषक तत्वांनी भरलेलं चॉकलेटच निवडतो, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं.






