विराट कोहली-केएल राहुल भर सामन्यात भिडले; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

On: April 28, 2025 10:28 AM
Virat Kohli & KL Rahul
---Advertisement---

Virat Kohli & KL Rahul | आयपीएल २०२५ च्या १८व्या मोसमातील ४६व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. मात्र या सामन्यात खेळाच्या जोडीला एक अनपेक्षित घटना घडली – विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात भर मैदानात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Virat Kohli & KL Rahul Clash Video)

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावादरम्यान, आरसीबीच्या फलंदाजीच्या वेळी हा प्रकार घडला. कुलदीप यादव आठवी ओव्हर टाकत असताना विराट कोहली आणि दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल यांच्यात काहीसे खटके उडाले. विराट काहीतरी बोलत स्टंप्सजवळ गेला आणि केएल राहुलला हातवारे करत काही सांगताना दिसला, तर राहुल त्याचे स्पष्टीकरण देत होता.

वादाचा नेमका मुद्दा काय? :

केएल राहुलने काहीतरी म्हटले, जे विराटला मान्य नव्हते. त्यामुळे विराट त्याच्याशी थेट संवाद साधायला गेला. दोघांमध्ये काही क्षण तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र वादाचा नेमका विषय काय होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, मैदानावर दोन मोठ्या खेळाडूंमध्ये असा प्रसंग घडल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Virat Kohli & KL Rahul Clash Video)

या वादाच्या पार्श्वभूमीवर आरसीबीने मात्र सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने केवळ ४ विकेट्स गमावत १८.३ ओव्हरमध्ये १६५ धावा करत ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला.

या विजयात कृणाल पंड्याचा मोठा वाटा राहिला. कृणालने ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. त्याला विराट कोहलीची ५१ धावांची खेळी मोलाची साथ मिळाली. दोघांनी मिळून आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

Virat Kohli & KL Rahul | आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी :

या विजयासह आरसीबीने आयपीएल २०२५ (IPL 2025) च्या गुणतालिकेत जोरदार झेप घेतली आहे. आरसीबीने (RCB Top) १२ गुणांसह पहिले स्थान पटकावले असून, त्यांनी गुजरात टायटन्सला (GT) मागे टाकले आहे. त्यामुळे आरसीबीचे प्लेऑफ स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सामन्यातील खेळ आणि मैदानावरील विराट-केएल राहुल यांचा वाद यामुळे हा सामना चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील सामन्यांमध्ये दोघांमधील संबंध कसे राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Virat Kohli and KL Rahul Clash During IPL 2025 Match, Video Goes Viral | RCB Beat DC

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now