विराट अनुष्काने घेतला सर्वात मोठा निर्णय, जवळच्या व्यक्तीकडून खुलासा!

On: December 20, 2024 7:40 PM
virat kohli
---Advertisement---

Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघे चाहत्यांसाठी काही न काही शेअर करत असतात. अनेकवेळा अनुष्का आणि विराट एअरपोर्टवर स्पाॅट होत असतात.

दोघे आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच पर्सनल लाईफमुळे चांगलेच चर्चेत असतात. दरम्यान विराट आणि अनुष्का भारत सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवळच्या व्यक्तीकडून याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.

 विराट अनुष्का भारत सोडणार?

समोर आलेल्या माहितीनूसार विराट अनुष्का त्यांच्या दोनही मुलांसह म्हणजेच वामिका आणि अकाय यांना घेऊन लंडनमध्ये स्थायिक होऊ शकतात अशा चर्चा सुरु आहेत. विराट (Virat Kohli) अनुष्का दोघेही आतापर्यंत अनेकदा लंडनमध्ये वेळ घालवण्यासाठी जात होते, मात्र आता त्यांनी तिथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे, असं विराटच्या कोचने सांगितलं आहे. ही बातमी त्यांनी कन्फर्म केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

असा निर्णय का घेतला?

लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या निर्णयामुळे विराटचे घर आता लंडनमध्ये असणार आहे. त्यांनी या शहरातील एक सुखवस्तू आणि सुरक्षित निवासस्थान निवडले असणार, जेथे त्यांच्या कुटुंबाला आरामदायी जीवन मिळेल. लंडनमध्ये विराट कोहली अनेकदा विश्रांतीसाठी जात होता, आता ते तिथे स्थायिक होणार असल्याने विराटला त्याच्या कुटुंबासह अधिक वेळ घालवायला मिळेल. शिवाय त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील बदलामुळे हा निर्णय घेतला आहे.

विराट (Virat Kohli) कोहली निवृत्त होणार का, असा प्रश्न अनेकदा विचारला जात होता, पण राजकुमार शर्मा यांनी या बाबतची चिंता दूर केली. त्यांनी सांगितलं की विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि तो आणखी 5 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील यश आणि त्याची क्रीडा भावना पाहून असं दिसतं की तो लवकर निवृत्त होणार नाही.

News Title : Virat kohli and anushka to leave india

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; सर्वात मोठा निर्णय घेतला

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

“वाल्मिक कराडला सोडणार नाही”; सरपंच हत्याप्रकरणी फडणवीस आक्रमक

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now