Virat Kohli and Anushka Sharma | भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushkna Sharma) लंडनला शिफ्ट होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण आता प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती, डॉ. श्रीराम नेने यांनी स्पष्ट केलं आहे.
डॉ. नेने यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, विराट आणि अनुष्का आपल्या मुलांना अत्यंत साधेपणाने आणि सामान्य वातावरणात वाढवण्याची इच्छा बाळगतात. त्यामुळे ते भारतातील प्रचंड प्रसिद्धीपासून दूर राहण्यासाठी लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत. “त्यांना मिळालेल्या यशाचा शांतपणे आनंद घ्यायचा आहे आणि मुलांना साध्या जीवनशैलीत वाढवायचं आहे,” असं डॉ. नेने यांनी नमूद केलं.
मुलांचं साधं आणि खाजगी जीवन हवंय विरुष्काला :
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) दोन्ही मुलांना – वामिका आणि अकाय यांना लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून आला आहे. दोघांनीही मुलांचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे आणि सोशल मीडियावरही अजूनपर्यंत मुलांचे चेहरे उघड केलेले नाहीत.
सध्या विराट आयपीएलमध्ये व्यस्त आहे, तर अनुष्का तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. अधिकृतपणे लंडन शिफ्ट होण्याबाबत विराट किंवा अनुष्काकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, त्यांच्या या निर्णयामागील प्रेमळ विचार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केला जात आहे.






