Viral News | आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान एक अविभाज्य घटक बनले असले तरी, काही वेळा त्याचे अनपेक्षित आणि त्रासदायक परिणामही समोर येऊ शकतात. चीनमधील (China) एका जोडप्याच्या बाबतीत नेमके हेच घडले असून, तंत्रज्ञानाच्या एका विचित्र कारणामुळे त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला आहे.
प्रियकराचा संशय आणि नात्याचा शेवट-
चीनमध्ये (Viral News) घडलेल्या या घटनेत, एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत असलेले नाते केवळ एका कारणावरून संपुष्टात आणले. हॉटेलच्या वायफायला (WiFi) प्रेयसीचा मोबाईल आपोआप कनेक्ट झाल्याने प्रियकराच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्याने थेट ब्रेकअपचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, संबंधित तरुणीने यापूर्वी त्या हॉटेलला कधीही भेट दिली नसल्याचा दावा केला आहे. मात्र, तिच्या प्रियकराने तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आले.
वायफाय कनेक्शनची पार्श्वभूमी –
घडलेली (Viral News) घटना अधिक तपशिलात पाहिल्यास, जेव्हा ती तरुणी हॉटेलमध्ये चेक-इन करत होती, तेव्हा तिच्या लक्षात आले की ती आपले वैयक्तिक ओळखपत्र घरीच विसरली आहे. अशा परिस्थितीत तिने आपले डिजिटल ओळखपत्र मोबाईलवर मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला.
याच प्रयत्नात असताना, तिचा मोबाईल फोन हॉटेलच्या वायफाय नेटवर्कशी आपोआप जोडला गेला. ही अनपेक्षित घटना आणि त्यानंतर झालेले ब्रेकअप सध्या जगभरातील लोकांसाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनले आहे.






