विनोद तावडेंच्या डायरी संबंधित नव्या दाव्यानं राजकारणात पुन्हा खळबळ!

On: November 20, 2024 11:00 AM
Vinod Tawde
---Advertisement---

Vinod Tawde l विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. त्यातच विरारमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील विवांत या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते असा दावा बविआने केला होता.

क्षितिज ठाकुरांनी केला मोठा आरोप :

यावेळी विवांत हॉटेलमध्ये विद्यामान आमदार क्षितिज ठाकूर हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी भाजप नेते विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. तसेच विनोद तावडे हे 5 कोटी रुपये घेऊन हॉटेलमध्ये आले होते. तसेच त्यांच्यासोबत डायऱ्या देखील होत्या असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला.

मात्र भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे ज्या डायऱ्या सापडल्या आहेत, तब्बल त्यामध्ये 15 कोटींची नोंद असल्याचा आरोप क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले होते.

Vinod Tawde l भाजपचा खेळ खल्लास :

यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी भाजपचा खेळ खल्लास…जे काम निवडणूक आयोगाने करायला हवे होते ते मात्र ते काम ठाकूरांनी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

या प्रकरणावरून भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांची गाडी देखील तपासली. मात्र क्षितिज ठाकूरांचे कार्यकर्ते देखील गाडी तपासण्यासाठी मागत आहेत. मात्र निवडणूक आयोगाच्या टीमने गाडी तपासल्यानंतर कार्यकर्त्यांनीच काही गैरप्रकार केला तर काय, असं विनोद तावडेंच्या टीमचं म्हणणं आहे.

News Title – Vinod Tawde In Virar News

महत्त्वाच्या बातम्या-

शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!

ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर

नागरिकांनो ‘या’ पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!

288 जागांसाठी आज मतदान, महाविकास आघाडी vs महायुतीमध्ये चुरशीची लढत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now