विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?; हितेंद्र ठाकूरांच्या खुलाशाने खळबळ

On: November 19, 2024 2:50 PM
Vinod Tawde
---Advertisement---

Vinod Tawde | विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते असा थेट दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

डायरीमध्ये नेमकं काय लिहलंय? :

यावेळी वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. “पाच कोटीच वाटप चालू आहे. यासंदर्भात मला डायऱ्या देखील मिळाल्या आहेत. तसेच लॅपटॉप देखील आहे. त्यामुळे कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती देखील माझ्याकडे आहे असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मिलेल्या डायरीमध्ये नेमकं काय आहे यासंदर्भातील देखील खुलासा केला आहे. यावेळी मिळालेल्या डायरीमध्ये वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा उल्लेख केलेला आहे. याशिवाय 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व देखील त्या डायरीमध्ये लिहिल आहे.

Vinod Tawde | इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी :

या संपूर्ण घटनेवर विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी थेट कारवाई करावी अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबतच इथे राहतील. कारण मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यामुळे त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं असं देखील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हंटल आहे.

यासोबतच भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही त्यांना सोडू. कारण मी कायदे व नियम पाळणारा माणूस आहे असं देखील हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

News Title –  vinod tawde hitendra thakur virar cash distribution allegaton

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलं मोठं आश्वासन!

‘मला माफ करा, जाऊ द्या..’ पैसे वाटताना पकडताच तावडेंकडून विनवणी; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now