मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला

On: November 28, 2024 9:35 AM
Vinod Tawde and Amit Shah met in Delhi
---Advertisement---

Vinod Tawde | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता सहा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला नाही. तसेच, मुख्यमंत्री पदाबाबतही अजून काही घोषणा करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे पक्के दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांनी काल (27 नोव्हेंबर) घतेलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडला.  यानंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली. (Vinod Tawde)

त्यातच दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. दिल्लीत मध्यरात्री या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली?

मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला असल्याचं म्हटलं जातंय. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर दिल्लीत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. (Vinod Tawde)

गेल्या काही दिवसांत झालेली मराठा आंदोलने, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक वाद याचा विचार करता फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर त्याचा मराठा मतांवर काय परिणाम होईल याबाबत दिल्लीत चर्चा झाली असल्याचं म्हटलं जातंय. विनोद तावडे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स हा आणखीनच वाढला आहे.

आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक

भाजपसमोर गैर मराठा मुख्यमंत्री करण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दिल्लीत महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो, यावर चर्चा झाली. आज (28 नोव्हेंबर) अमित शाह पुन्हा महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत आता काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (Vinod Tawde)

News Title :  Vinod Tawde and Amit Shah met in Delhi

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट उसळणार, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

“मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेऊन माझे बाबा..”; श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत

आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!

‘डायरेक्टर कट म्हटला तरी तो करतच राहिला….’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

‘माझा पक्ष, माझे वडिल….’; पार्थ पवारांचा अमोल मिटकरींना थेट इशारा

Join WhatsApp Group

Join Now