‘कट म्हटल्यानंतरही तो किस करत राहिला शिवाय चावा…’, माधुरी दीक्षितच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं!

On: April 29, 2025 1:19 PM
madhuri dixit.
---Advertisement---

Madhuri Dixit | बॉलिवूड चित्रपट ‘दयावान’ (Dayavan) प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील प्रमुख कलाकार विनोद खन्ना (Vinod Khanna) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या अंतरंग दृश्यामुळे खळबळ उडाली होती. या दृश्याच्या चित्रीकरणात खन्ना स्वतःचा ताबा गमावून बसले आणि ‘कट’ झाल्यानंतरही माधुरीला किस करत राहिले. एवढंच नाही तर त्यांनी २० वर्षांच्या माधुरीला चावल्याचंही सांगितलं जातं, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली होती.

विवादित दृश्यामुळे निर्माण झाला मोठा गोंधळ-

त्याकाळच्या अनेक अहवालांमध्ये म्हटले होते की विनोद खन्ना तब्बल पाच मिनिटे माधुरीला किस करत राहिले आणि तिला ओठावर चावा घेतला. या घटनेमुळे माधुरीच्या ओठातून रक्तस्राव झाला आणि ती थांबून थांबून रडत होती. नंतर खन्ना यांनी माधुरीची माफी मागितल्याचंही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं. या प्रकारामुळे ‘दयावान’च्या प्रदर्शनावेळी मोठा वाद झाला होता आणि प्रेक्षकांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

वादग्रस्त दृश्य ठेवण्यासाठी घेतला मोठा निर्णय-

‘दयावान’चे दिग्दर्शक फिरोज खान (Feroz Khan) यांना या दृश्यामुळे कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली होती आणि त्या दृश्याला चित्रपटातून वगळण्याची मागणी केली गेली होती. माधुरीनेही (Madhuri Dixit) स्वतः फिरोज खानकडे हे दृश्य काढून टाकण्याची विनंती केली होती. मात्र, चित्रपटात या दृश्याला कायम ठेवण्यासाठी फिरोज खान यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च केला. त्यामुळे या प्रसंगाने त्यावेळी मोठे वादंग निर्माण केले होते.

मुलाखतीत उलगडला धक्कादायक अनुभव-

एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने खुलासा केला होता की ‘दयावान’च्या चित्रिकरणाच्या वेळी ती त्या विशिष्ट अंतरंग दृश्याबाबत अनभिज्ञ होती. तिने असेही सांगितले की आजही जेव्हा ती तो क्षण पडद्यावर पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. तिच्या या अनुभवामुळे बॉलिवूडमधील अशा प्रकारच्या प्रसंगांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली होती.

News Title – Vinod Khanna’s Controversial Scene With Madhuri dixit

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now