Ajit Pawar l राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करण्यात व्यस्त आहेत. तसेच राज्यातील इच्छुक उमेदवारांनी देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता विधानसभेकच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवार गटाने मोठा धक्का दिला आहे.
अजित पवारांना मोठा धक्का :
गेल्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली आहे. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चागलं यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यातील नेतेमंडळी व कार्यकर्ते त्यांच्या पक्षाकडे येण्यास भर देत आहेत. कारण आगामी विधानसभा अत्यंत महत्वाची मनाली जात आहे.
अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा देखील कला वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेते देखील शरद पवारांकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणूक झाल्यापासून शरद पवारांची भेट घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.
Ajit Pawar l विधानसभेला विलास लांडे तुतारी फुंकणार :
अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आणि भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
येत्या विधानसभेत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांची तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. मात्र आता विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण विलास लांडे यांना अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत त्यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे.
News Title – Vilas lande come to sharad pawar group
महत्वाच्या बातम्या-
“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल
लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली देवाला सुद्धा…
बिग बॉस ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन; व्होटिंग लाइन्स ‘या’ दिवशी बंद होणार?






