‘ते’ दोन नेते घरवापसी करणार?; बालेकिल्ल्यात अजित पवारांचं पुन्हा कमबॅक?

On: January 18, 2025 3:35 PM
Vilas Lande Ajit Gawhane will return to Ajit Pawar group
---Advertisement---

Ajit Pawar | पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि भोसरी (Bhosari) भागात अजित पवार यांनी आपला प्रभाव पुन्हा वाढवण्याचा निर्धार केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यापूर्वी शरद पवार गटात गेलेल्या नेत्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या गटात येण्याचे संकेत दिले आहेत. (Ajit Pawar)

विलास लांडे (Vilas Lande) आणि अजित गव्हाणे (Ajit Gawhane) यांनी आपल्या निवेदनांमुळे या राजकीय समीकरणांना अधिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे.

‘ते’ दोन नेते परतणार?

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला साथ देणाऱ्या नेत्यांनी आता पुन्हा अजित पवार यांच्याकडे वळण्याचे संकेत दिले आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी जाहीर केले की आगामी महापालिका निवडणुकीत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेणार.

विलास लांडे यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवड आणि भोसरी परिसराचा वेगवान विकास झाला आहे. त्यामध्ये उद्योगक्षेत्राचा विकास, रस्त्यांचे जाळे आणि आरोग्यसेवा यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या भागातील लोक अजित पवारांना आपल्या नेत्याच्या भूमिकेत पाहतात, असे लांडे म्हणाले. (Ajit Pawar)

अजित गव्हाणे आणि नगरसेवकांची हालचाल

महानगरपालिका निवडणुकीच्या आधी, अजित गव्हाणे आणि त्यांच्या सोबतच्या 20 माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा अजित पवार गटात परतण्याचा विचार सुरू केला आहे. गव्हाणे यांची अजित पवार यांच्यासोबत फोनवर चर्चा झाल्याचे सांगितलं जातंय.

विलास लांडे यांनीही या संदर्भात बोलताना म्हटले की, गव्हाणे आणि इतर नगरसेवकांनी भोसरीच्या विकासासाठी पुन्हा अजित पवारांना समर्थन देणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा चेहरामोहराच अजित पवार यांच्यामुळे बदलला आहे, असे लांडे यांनी आवर्जून नमूद केले. (Ajit Pawar)

Title :  Vilas Lande Ajit Gawhane will return to Ajit Pawar group

महत्वाच्या बातम्या- 

लेकीबाबत बोलताना अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

सर्वांत मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदाराचा भीषण अपघात

चार्जिंगची कटकट नाही, सौरऊर्जेवर चालणार इलेक्ट्रिक कार, पाहा संपूर्ण माहिती

ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now