‘पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने…’; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

On: December 31, 2024 4:33 PM
Walmik Karad surrender
---Advertisement---

Walmik Karad | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहकरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून वाल्मिकी कराडवर देखील आरोप करण्यात येत आहेत. अखेर घटनेच्या 22 व्या दिवशी वाल्मिकी कराड याने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिक कराडने (Walmik Karad) सरेंडर केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही यावर संशय व्यक्त केला आहे.

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस, सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले, या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष  बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. वाल्मिकी कराडवर मोक्का अंतर्गंत कारवाई करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. जोपर्यंत वाल्मिकी कराडवर मोक्का लावण्यात येत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंकडे बीडचं पालकमंत्री पद देऊ नये, कोणालाही द्या पण जर या प्रकरणात देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर मुंडेंना पालकमंत्रिपद देऊ नका अशी मागणी संभाजीराचे छत्रपती यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर संभाजीराजेंनी फडणवीस अन् अजितदादांना केलं टार्गेट!

“तर इतके दिवस…”, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया समोर

बंदोबस्त कमी, शरण येण्याची शक्यता नाही?… तोच पांढऱ्या स्कॉर्पिओतून कराडची एन्ट्री… नेमकं काय घडलं?

सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड कुठे होता? कार्यकर्त्यांनी दिली महत्वाची माहिती

वाल्मिक कराडसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले…

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now