‘140 कोटींच्या देशाने सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल….’; विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य चर्चेत

On: May 7, 2025 11:48 AM
Vijay Wadettiwar
---Advertisement---

Vijay Wadettiwar  | पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारच्या संभाव्य कारवाईला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यांनी सरकारच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘प्रसारमाध्यमांवरील युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करा’ असे म्हटले आहे. त्यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडवली आहे.

‘प्रत्यक्ष युद्ध करा, नुसता देखावा नको’

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत, अतिरेकी अजूनही सापडलेले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात आणलेल्या स्फोटकांचा उगमही अज्ञात आहे. सरकारने सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, सरकार जी पावले उचलेल, त्याला पक्षाचा पाठिंबा असेल आणि सरकारने युद्धाची भूमिका घेतल्यास काँग्रेस  पाठीशी उभी राहील.

मात्र, केवळ प्रसारमाध्यमांवर युद्ध न दाखवता प्रत्यक्ष कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी वडेट्टीवार (Wadettiwar) यांनी केली. केंद्र सरकारने (Central Government) ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रील (Mock Drill) (युद्धसराव) आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत, यावर बोलताना ते म्हणाले की, हा सराव केवळ दिखावा ठरू नये. सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘१४० कोटींच्या देशाने सू सू केली तरी…’

वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक शैलीत पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली. “इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते आणि लाहोरपर्यंत (Lahore) सैन्य घुसवले होते. आता तर आपली युद्धसज्जता खूप मोठी आहे. १४० कोटींच्या देशाने सीमेवर सू सू केली तरी पाकिस्तान वाहून जाईल. पाकिस्तानची  लायकी काय? त्यामुळे एक घाव दोन तुकडे करा,” असे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष म्हणून सरकारला यासाठी पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, चौंडी (Chaundi), अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही त्यांनी टीका केली. ही बैठक राजकीय हेतूने आणि धनगर समाजाची मते मिळवण्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बैठकीवर होणारा कोट्यवधींचा खर्च धनगर समाजाच्या विकासासाठी वापरता आला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Title : Vijay Wadettiwar Slams Pak, Backs Action

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now