निधनानंतर जसा मातंग होता, तसा…; विजय शिवतारेंची तिखट भाषेत नाराजी व्यक्त

On: December 18, 2024 4:43 PM
Vijay Shivtare
---Advertisement---

Vijay Shivtare l सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे पुरंदरला निघून गेले आहेत. कारण आमदार विजय शिवतारे यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

विजय शिवतारे स्पष्टच बोलले :

आमदार विजय शिवतारे म्हणाले की, दोन तीन दिवसात जे काही झालं त्यामुळे माझा मूड गेला आहे. कारण माझी पात्रता असताना देखील मला डावलले गेलं. मात्र या डावलण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही कारणे असतील. तसेच मला मंत्री पद का नाकारले मला देखील माहित नाही, पण ठीक आहे, कारण हा कुटुंबातील प्रश्न आहे. तो आम्ही बघू मात्र मी नाराज झालो होतो.

परंतु, मंत्रिपद मिळेल म्हणून कुटुंबातील सगळे लोकं नागपुरात आले होते. मात्र एखादा माणसाचं निधन झाल्यावर जसा मातंग होता, तसा त्यावेळी झाला, त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. तसेच माझे कार्यकर्ते गाड्या घेऊन आले होते, मात्र त्यांचा देखील अपेक्षा भंग झाला. कारण माझ्यात कॅपिसिटी होती म्हणून मला वाटत होते मंत्रिपद मिळेल, पण तसे काहीही झालं नाही. याशिवाय मला मंत्री पद मिळणार नाही हे दोन दिवसापूर्वी सांगितले असते तर मी शांत राहिलो असतो, उलट मी तिथे थांबून दुसऱ्याला मंत्रिपद दिले असते. अशी आगपाखड करत आमदार विजय शिवतारे यांनी तिखट भाषेत नाराजी बोलून दाखवली आहे.

Vijay Shivtare l शिवतारेंचा अजित पवारांना टोला :

दरम्यान, मी निवडणूक झाल्यावर मुंबईत होतो, त्यामुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळयांसमोर ठेवून आज देखील बैठक घेतली आहे. परंतु, मी पुन्हा आज नागपूरला जाणार आहे. विजय शिवतारे हा पक्षाचा माणूस आहे. जर विजय शिवतारे यांना मंत्रिपद का दिल नाही असं मी कुणाला विचारणार देखील नाही.

कारण आमच्या वाईटावर असून सुद्धा मी तब्बल 27 हजाराचा मताधिक्य जनतेने मला दिलं आहे. त्यामुळे मला त्यांची सेवा करायची आहे. तसेच कोण वाईटावर आहे हे सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे कशाला ते बोलायचं. याशिवाय माझे मंत्रीपद कापण्या इतपत त्यांची पोहोच देखील नाही. असे म्हणत नाव न घेता विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे.

News Title – Vijay Shivtare on Mahayuti Cabinet Expansion

महत्त्वाच्या बातम्या-

आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसत नाही? भुजबळ स्पष्टच बोलले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?

“अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला”, भुजबळ समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका!

काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now