Vidya Balan l सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री विद्या बालनला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळत असते. तिच्या अभिनयाने आणि बोल्डनेमुळे ती कायमच चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्री विद्या बालन एका दुसऱ्या कारणामुळे म्हणजेच तिने तिच्या घराविषयी केलेल्या खुलास्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे.
… म्हणून विद्या बालन भाड्याच्या घरात राहते :
अभिनेत्री विद्या बालनने तिच्या घराबद्दलच एक गुपित सांगितलं आहे. सध्या विद्या बालन (Vidya Balan) ज्या आलिशान घरातमध्ये राहते ते घर पाहून अनेक चाहत्यांना हेवा वाटतो. मात्र यासंदर्भात विद्या बालनने घरासंदर्भात एक महत्वाची माहिती चाहत्यांना दिली आहे. विद्या बालन ज्या घरात राहते ते घर तिचं नाहीये. तर ती त्या घरात भाडेतत्वावर राहते.
अशातच आता अभिनेत्री विद्याने एका कार्यक्रमात सांगितलं की, मी आणि माझा पती भाड्याच्या घरात राहतो. विद्यानं सांगितलेल्या माहितीनुसार लग्नानंतर ती आणि तिचा चित्रपट निर्मिती क्षेत्रात सक्रिय असणारा पती, सिद्धार्थ रॉय कपूर घर शोधण्यासाठी निघाले होते. मात्र घराच्या शोधाविषयी सांगताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, आम्ही जवळपास 25 घरं पाहिली पण, एकाही घराच्या बाबतीत आमचं एकमतच झालेलं नाही.
Vidya Balan l नशीब असेल तरच स्वतःच घर मिळत :
शेवटी एक असं घर मिळालंच जे आम्हाला दोघांनाही आवडलं. मात्र ते घर भाडेतत्त्वावर असणारं ही होष्ट मनाला प्रचंड खटकत होती.मात्र अभिनेत्री विद्या बालनला कधीच भाडेतत्त्वावरील घरात राहायची इच्छा नव्हती. परंतु स्वप्नातलं हवं तसं घर शोधण्यासाठी त्या दोघांनी ही बरेच प्रयत्न केले आणि पुन्हा ते त्याच भाड्याच्या गहरात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
तसेच इतक्या गर्दीच्या शहरामध्ये बागबगीचा आणि समुद्राचा नजारा असणारं घर मिळणं प्रचंड कठिण आहे, असं म्हणत विद्या बालनने या गोष्टीचा खुलासा केला आहे. याशिवाय मनासारखं घर शोधणं हे नशिबात असेल तरच शक्य होतं असं विद्याचं ठाम मत आहे.
News Title : Vidya Balan live in a rented house
महत्वाच्या बातम्या –
10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका; परीक्षेबाबत शिक्षणमंडळाने घेतला मोठा निर्णय
भूमिका देणार म्हणून झोपायला…; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ!
सूरजच्या कुटुंबियांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं!
1 ऑक्टोबरपासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ यांची चिंता करू नये; भाजप नेत्याचा पलटवार






