ठाकरेंच्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळणार? संभाव्य उमेदवारांची यादी

On: September 5, 2024 3:32 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Vidhansabha Election l महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मुंबईची तयारी केली असून, मुंबईत ठाकरेंचे तीन खासदार निवडून आले, तर ठाकरे आता जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या तयारीत आहेत. जागांचे वाटप अद्याप झालेले नाही, तरीही उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील २२ जागांसाठी तयारी सुरू केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल :

मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत, ज्यामध्ये गेल्या वेळी मुंबईत उद्धव ठाकरेंनी सुमारे 14 जागा जिंकल्या होत्या आणि एकूण 56 आमदार मुंबईत मुस्लिम आणि दलितांची संख्या जास्त आहे, त्यामुळे काँग्रेसही अधिक जागा मिळवण्यावर ठाम आहे.अशातच मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे.

मुंबईत 36 जागा आहेत. 2019 मध्ये ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईत 14 जागा जिंकल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत काही जागांची अदलाबदल होणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. मुंबईत जिंकलेल्या जागा आणि ज्या जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत आणि ज्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जास्त आघाडी मिळाली आहे, त्यावर उद्धव ठाकरे भर देत आहेत.

Vidhansabha Election l ठाकरे गटाचे मुंबईतील संभाव्य उमदेवार :

1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे

2. विनोद घोसाळकर : दहिसर

3. सुनिल प्रभू : दिंडोशी

4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी

5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम

6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा

7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व

8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम

9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी

10. आदित्य ठाकरे : वरळी

11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा

12. ईश्वर तायडे : चांदीवली

13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर

14. रमेश कोरगांवकर : भांडुप

15. सुनिल राऊत : विक्रोळी

16. संजय पोतनीस : कलिना

17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर

18. सुरेश पाटील : घाटकोपर

19. प्रविणा मोरजकर : कुर्ला

20. निरव बारोट : चारकोप

21. समीर देसाई : गोरेगाव

22. श्रद्धा जाधव : वडाळा

News Title – Vidhansabha Election Uddhav Thackeray Group

महत्त्वाच्या बातम्या-

गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार? म्हणाली मी आता…

‘एकाच महिलेला किती…’; राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद

महायुतीचं टेंशन वाढलं?; शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार

सोलापुरात राजकीय भूकंप, शिंदे व अजितदादा गटाचे दोन बडे नेते महाविकास आघाडीत

गणेश चतुर्थीला राशीनुसार करा हे उपाय, होईल मनातील इच्छा पूर्ण

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now