लीला गांधींना जीवनगौरव! बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनी मोठा सन्मान

On: June 19, 2025 5:21 PM
Leela Gandhi Award
---Advertisement---

Leela Gandhi Award | मराठी रंगभूमीचा अभिमान असलेलं बालगंधर्व रंगमंदिर यंदाही आपला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यानिमित्ताने 24 जून ते 26 जून 2025 या कालावधीत तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी (Leela Gandhi Award) यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. उद्घाटन सोहळा 24 जून रोजी सकाळी 9.30 वाजता अंजली राऊत यांच्या गणेश वंदनेने होणार आहे. त्यानंतर विविध संगीत नाट्यप्रवेश, गजल आणि गीतांचे सादरीकरण होईल. संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर विशेष चर्चासत्र होणार असून त्यात विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दामले सहभागी होतील.

राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती :

जीवनगौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कलाकारांमध्ये प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अभिनय बेर्डे, देवयानी बेंद्रे, पूजा पुरी यांचाही सहभाग असेल.

दुसऱ्या दिवशी, 25 जून रोजी, एकपात्री अभिनय, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महिलांसाठी लावणी महोत्सवाचे आयोजन आहे. यामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद सहभागी होणार आहेत. ‘स्त्री आज कितपत सुरक्षित?’ या विषयावर संध्याकाळी चर्चा होणार असून अंजली दमानिया, रूपाली चाकणकर, तृप्ती देसाई यांसारख्या कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत.

Leela Gandhi Award | लोकसंगीत, लावणी आणि ‘ऑल इज वेल’ टीमसोबत गप्पा :

26 जून रोजी, ‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘मोगरा फुलला’ यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. यानंतर पारंपरिक लावण्यांचा कार्यक्रम होणार असून रात्री ‘ऑल इज वेल’ चित्रपटातील कलाकारांसोबत संवादाचा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.

प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचा कलाविष्कार यावेळी रंगणार आहे. तीनही रात्री गाण्यांचे कार्यक्रम महोत्सवात रंगतदार भर घालणार आहेत.

News Title: Veteran Actress Leela Gandhi to Receive Lifetime Achievement Award at Balgandharva Rangmandir Festival

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now