पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली.
विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. चित्रपटसृष्टीतील ही हानी भरून काढता न येणारी अशी आहे.
अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समिक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं.
2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-






