पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

On: August 20, 2024 7:56 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणेकरांच्या फायद्याची बातमी समोर आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने नवी सेवा सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने ‘आपली पीएमपीएमएल’ ही मोबाईल ॲप सेवा सुरू केलीये.

प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन समजावे, ऑनलाईन तिकीट काढता यावे, यासाठी ‘पीएमपी’चे मागील तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात यश आले नाही. आता ‘पीएमपी’ने ‘आपली पीएमपीएमएल’ हे मोबाईल ॲप तयार करून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध केलंय.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

लाइव्ह ट्रॅकिंग होऊन थांब्यावर किती वेळात बस येईल हे कळेल. तसेच, या ॲपमुळे ऑनलाईन तिकीट नोंदणी आणि दैनंदिन पासची सुविधा उपलब्ध झाली आहे.

शनिवारपासून ॲप सुरु करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच ऑनलाइन तिकीट

काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी माहिती मुख्य माहिती वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली आहे.

Pune News | आपली पीएमपीएमएल ॲप सुरू

पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी माहिती गव्हाणे यांनी दिली आहे. या माध्यमातून ‘पीएमपी’ला 65 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची मुख्य माहिती वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.

‘आपली पीएमपीएमएल’ ही मोबाईल ॲप सेवा सुरू केलीय. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी 38 हजार प्रवाशांनी ॲप डाउनलोड केले असून तब्बल एक हजार तिकीट व 500 दैनंदिन पास ॲपद्वारे काढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बदलापूर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द?, बाल हक्क आयोग ॲक्शन मोडवर; मंत्री अदिती तटकरे आक्रमक

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार?

पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना, म्हणाले… ‘आरोपीला…’

केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now