श्रावणात चिकनपेक्षाही वांगी झाली महाग, इतर भाज्यांचेही दर कडाडले

On: August 14, 2024 12:52 PM
Vegetables Price Hike
---Advertisement---

Vegetables Price Hike | सध्या श्रावण महिना सुरू आहे. या काळात उपवासांची सत्र सुरू होतात आणि मग अनेक घरांमध्ये उपवासाच्या फराळासाठीची लगबग सुरू होते. श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो. जवळपास संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. मग, अशा काळात पालेभाज्या, फळभाज्या याला मागणी वाढते. (Vegetable Price Hike)

सध्या श्रावण महिना सुरू असून अशावेळी भाज्यांचे (Vegetables Price Hike )दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वमान्यांचं बजेटही यामुळे कोलमडलं आहे. सणवारांच्या दिवसांमध्येच मागणी वाढल्यामुळं भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटार यांसारख्या भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत.

वांगी चिकनपेक्षा महाग झाली

सध्या बाजारात चिकनपेक्षाही भाज्या महाग झाल्या आहेत. सांगलीच्या प्रसिद्ध कृष्णाकाठच्या वांग्याचा दर तब्बल 160 रुपये किलोवर पोहोचला आहे. तर, इतर बाजारात वांगी ही 140 ते 160 रुपये किलोने विकली जात आहेत.

याचबरोबर दोडका, प्लॉवर 70 ते 80, भेंडी 90 ते 100, गवार 100 ते 120, कारली 50 ते 60 आणि घेवडा 70 ते 80 रुपये प्रतिकिलो आहे. श्रावण महिना असल्याने सध्या (Vegetables Price Hike )अनेक घरांतून चिकन हद्दपार झालं आहे. चिकन आणि अंडी यांचे दर घसरले आहेत. तर, भाज्यांचे दर वाढतच चालल्याचे चित्र आहे.

भाजीपाला तसेच डाळींचे दर भिडले गगनाला

अनेक जण हे अनंत चतुर्दशीनंतरच मांसाहार खातात. यामुळे मांसाहार विक्रेत्यांना श्रावण संपल्यानंतरही आणखी काही दिवस नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. अनंत चतुर्दशीनंतर चिकनची मागणी वाढू शकते. सध्या कडधान्ये देखील महाग झाल्याचे चित्र आहे.

बाजारात चणा डाळीने शंभरी गाठली असून तूरडाळ 180 रुपयांवर किरकोळ बाजारात विकली जात आहे. राज्यात काही ठिकाणी मॉन्सून लवकर दाखल झाल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम म्हणून आता भाज्यांचे दर वाढले आहेत. (Vegetables Price Hike )

News Title : Vegetables Price Hike

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! भारतातील मीठ आणि साखरेच्या अनेक ब्रँड्समध्ये आढळला ‘हा’ घातक पदार्थ

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या ब्रिटिश गायिकेला करतोय डेट?, फोटो झाले व्हायरल

भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!

प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा ‘हा’ बडा नेता कॉँग्रेसच्या वाटेवर; भाजपला ठोकला रामराम

या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!

Join WhatsApp Group

Join Now