‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

On: January 1, 2025 12:11 PM
Vasant More targets walmik karad
---Advertisement---

Vasant More | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड (Walmik Karad) फरार होता. जवळपास 20 ते 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला. काल 31 डिसेंबररोजी तो पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर कराडला बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (Vasant More)

वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विरोधकांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. तो स्वतः शरण आला तर मग इतके दिवस पोलीस काय करत होते?, असे सवाल देखील विरोधकांकडून करण्यात येत आहेत.अशातच पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी कालच्या घटनाक्रमावर भाष्य केलंय. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत यावर मोठं वक्तव्य केलंय.

वसंत मोरे काय म्हणाले?

वसंत मोरे यांची ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली असून त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत. वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांवर जोरदार टीका केली आहे. “वाल्मीक कराड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं ही तुमच्या बीडची मीडिया नाही हे आमचे अस्सल पुणेकर मीडियावाले आहेत इथे सापडला की ठोकला”, अशी पोस्ट वसंत मोरे (Vasant More) यांनी केली आहे.

दरम्यान, वाल्मीक कराड (Walmik Karad) स्वतः सरेंडर झाल्यानंतर त्याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. रात्री उशिरा कोर्टात ही सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर, कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद केला.

vasant more post

वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी

अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पवनऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर खंडणीचे आरोप होते. याच प्रकरणी त्याला केज कोर्टात हजर करण्यात आले होते.

2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर ही सुनावणी झाली. वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे. (Vasant More)

News Title :  Vasant More targets walmik karad

महत्त्वाच्या बातम्या-

बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

“खालचा अधिकारी उचलून खंडणी…”; सुरेश धसांनी वाल्मिक कराडचे कारनामेच केले उघड

यंदाच्या वर्षी कोणता सण किती तारखेला? पाहा सर्व सणांच्या तारखा एका क्लिकवर

न्यू इयरला मिळाली आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज, गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Join WhatsApp Group

Join Now