Pune News | पुण्यातील डॅशिंग, आक्रमक नेते अशी ओळख असलेले पुणेकरांचे तात्या अर्थात वसंत मोरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते असलेले वसंत मोरे यांनी पुण्यात घडलेल्या गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यांनी स्वत: हातोडा हातात घेऊन कारवाई केली आहे.
आरोपींना जामीन होऊ देऊ नये
पुण्यातील (Pune News) कात्रज भागात एका गाईची हत्या झाली होती. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी स्वत: त्या व्यक्तीच्या गोठ्यातील काही अनिधिकृत बांधकाम तोडलं आहे. त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
या व्यक्तीच्या मागे आणखी कोण, कोण आहेत? त्याचा शोध घ्यावा, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.
Pune News | “आरोपींना जामीन होऊ देऊ नये”
आरोपींना जामीन होऊ देऊ नये. कात्रज भागात असा प्रकार पुन्हा होऊ देऊ नये. अन्यथा, आम्ही परिणामांची पर्वा न करता कारवाई करु, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
गाईची हत्या करणार व्यक्ती हिंदू धर्मातील असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला. त्या ठिकाणी आता पुणे मनपाने कारवाई करावी. या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.
गोठ्याचे बांधकाम अवैध आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याने रिपोर्ट द्यावा, असे वसंत मोरे यांनी पोलिसांना दूरध्वनीवरुन सांगितले. हा व्यक्ती दुसऱ्यांदा असाच गुन्हा करताना सापडला आहे. त्याचे हे प्रकार वाढत आहेत, असंही वसंत मोरेंनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘शाहिद कपूरशिवाय मी…’; 17 वर्षांनी करिनाने ब्रेकअपबद्दल केला मोठा खुलासा
‘या’ तीन राशींना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार बक्कळ पैसा!
पितृपक्षात कावळ्यांनाच भोजन का दिले जाते? काय आहे यामागचे रहस्य






