Varun Dhawan l श्रद्धा कपूरचा नवा चित्रपट ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दररोज काही ना काही विक्रम मोडत आहे. ‘स्त्री 2’मध्ये अभिनेता वरुण धवनने कॅमिओ केला आहे. यापूर्वी त्याने दिनेश विजन निर्मित ‘भेडिया’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. श्रद्धा कपूर आणि वरुण धवनबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे नाते खूप जुने आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाने तिच्या आणि वरुणशी संबंधित काही रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.
वरुणला मुली आवडत नाहीत :
‘स्त्री 2’ च्या यशाने उत्साही झालेले कलाकार वरून धवन आणि श्रद्धा कपूर अत्यंत आनंदी झाले आहेत. यावेळी श्रद्धाने एक जुना किस्सा सांगितला आहे. एकदा वरुण धवनने तिच्या प्रपोजलला डायरेक्ट रिजेक्ट केलं होतं. खरंतर, श्रद्धा लहान असताना वरुण धवन हा श्रद्धा कपूरचा क्रश होता. श्रद्धा लहान असताना दोघं एका चित्रपटाच्या शूटिंगवर सोबत गेले होते. त्या प्रोजेक्टमध्ये त्या दोघांचे वडील देखील काम करत होते. त्या दरम्यान, खेळता-खेळता ते दोघं एका डोंगरावर पोहोचले होते. तिथेच श्रद्धाने वरुण धवनला प्रपोज केलं होतं.
त्यावेळी वरुण धवनवर श्रद्धाने तिचे प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले होते. ती म्हणाली होती की वरुण, मी चुकीचे बोलेन आणि त्याचा अर्थ तू समजून घे. यानंतर ‘आय लव्ह यू’ म्हणण्याऐवजी श्रद्धाने ‘यू लव्ह आय’ असे म्हटले होते. हे ऐकून वरुणने मला मुली आवडत नसल्याचे सांगून तेथून पळ काढला होता.
Varun Dhawan l श्रद्धा आणि वरुणने अनेक चित्रपटांमध्ये केलं सोबत :
दरम्यान, अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी ‘स्त्री 2’ मध्ये एकत्र काम केलं आहे. याआधी त्यांनी ‘एबीसीडी 2’ आणि ‘स्ट्रीट डान्सर 3’ या मोठ्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्या दोघांनी ‘भेडिया’ आणि ‘स्त्री 2’ मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती.
‘स्त्री 2’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात जगभरात तब्बल 300 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली आहे. याशिवाय भारतात या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच बजेट हे फक्त 50 कोटी रुपये होते. मात्र या चित्रपटाला चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे.
News Title : Varun Dhwan Does not Like Women
महत्वाच्या बातम्या-
… तर नराधमांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, सुप्रिया सुळे संतापल्या
“तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, आम्हाला न्याय द्या”; बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलेचा संताप
“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार
जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार






