Valmik Karad | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मीक कराड (Valmik Karad) फरार आहे. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, ते आज (30 डिसेंबर) कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर सरेंडर होऊ शकतात, असं म्हटलं जातंय.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्या प्रकरणी आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. हे प्रकरण आता थेट सीआयडीकडे गेले असून सीआयडीकडून तपास केला जातोय.अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.
वाल्मिक कराड आज सरेंडर होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.
सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. वाल्मिक कराड हे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. गेल्या दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे एनसीपीचे काम करत आहेत. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.अशात त्यांचे नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आले आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी शंभरहून अधिक जणांची चौकशी
वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावरून विरोधी गटानेही सत्ताधारी महायुतीला चांगलेच टार्गेट केले आहे. आता स्वतः वाल्मिक कराड आज शरण जाणार, अशी माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. त्यात आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांना सापडले आहेत.हे मोबाईल फॉरेन्सिक खात्याकडे पाठवण्यात आले असून याबाबत पुढील तपास सुरू आहे. अशात आज वाल्मिक कराड सरेंडर होणार काय? त्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
News Title : Valmik Karad likely to surrender today
महत्त्वाच्या बातम्या-
ठाकरे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण, राष्ट्रवादीची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेचं काय कनेक्शन?
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं नाव आल्याने मोठी खळबळ
“वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा, पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा”






