वैष्णवी शशांक हगवणे यांच्या शाही लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

On: May 20, 2025 6:28 PM
Vaishanvi Hagawane
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैष्णवी (Vaishnavi Hagawane) शशांक हगवणे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. १६ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवीने तिच्या बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला, ज्यात तिचा मृत्यू झाला.

आत्महत्या केलेल्या सुनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ सुरू होता, त्यामुळेच तिने आत्महत्या केली, असा आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे. (Pune Rajendra Hagwane News)

व्हायरल व्हिडीओ –

राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी घेतली, तसेच सनीज वर्ल्ड येथे लग्न करून देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करून दिले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

वैष्णवी (Vaishnavi Hagawane) ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांची सून आहे. हुंड्यासाठी सतत होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने पती शशांक यांनी दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी वैष्णवीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने घरच्या लोकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

बावधन पोलिसांनी शशांक राजेंद्र हगवणे, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (Rajendra Hagwane) , सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

News Title – vaishnavi hagawane marriage video goes viral

Join WhatsApp Group

Join Now