करिश्मा हगवणेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल!

On: May 23, 2025 10:50 AM
Karishma Hagawane
---Advertisement---

Karishma Hagawane | वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून आता तिची नणंद करिश्मा हगवणे (Karishma Hagawane) राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधामुळे चर्चेत आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) सोशल मीडियावर करिश्माचे काही फोटो शेअर केले असून त्यात ती सुनेत्रा पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिसत आहे. हे फोटो समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अंजली दमानियांनी थेट अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करत, “एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं, अशी भाषा गंभीर प्रकरणात वापरणं अजिबात योग्य नाही,” असा सवाल उपस्थित केला आहे. करिश्माच्या राजकीय संबंधांचा तपास करावा, अशी मागणी आता जोर धरतेय.

मयुरी हगवणेंचे धक्कादायक आरोप; करिश्माची घरात सत्ता होती :

वैष्णवीची जाऊ मयुरी हगवणेंने (Mayuri Hagawane) पत्रकार परिषदेत केलेले खुलासेही धक्कादायक आहेत. तिच्यानुसार, “करिश्मा हगवणे घरातील सर्व निर्णय स्वत: घेत असे. कोणते कपडे घालायचे, कोणती भाजी बनवायची यापासून ते आमच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत तिचा हस्तक्षेप होता.” पिंकी नावाने ओळखली जाणारी करिश्मा, हगवणे घरात एकतंत्री सत्ता गाजवत होती, असे मयुरीचे म्हणणे आहे.

करिश्मानं आजवर लग्न केलं नाही आणि तिचा विवाहाचा कोणताही विचार नाही. मात्र तरीही ती दोन्ही भावांच्या संसारात लुडबूड करत होती, असा थेट आरोपही मयुरी हगवणेंने केला आहे. त्यामुळे कुटुंबातील वातावरण प्रचंड दडपणाखाली होते, असं स्पष्ट होतंय. (Karishma Hagawane)

Karishma Hagawane | पोलिस तपास सुरू; महिला आयोगाची दखल :

पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीच्या सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे (Rajendra hagawane) यांना पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीचा छळ झाल्याचे, तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून जबरदस्तीने घडवलेली घटना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Vaishnavi Hagawane Death Case: Karishma Hagawane’s Photos with Sunetra Pawar Go Viral, Anjali Damania Reacts Strongly

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now