Hagawane Fortuner Car | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तपासात आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. बावधन पोलिसांनी MH 14 KU 2022 क्रमांकाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे. ही गाडी वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane Case) विवाहप्रसंगी हगवणे कुटुंबाला तिच्या वडिलांनी दिली होती. विशेष म्हणजे, या गाडीची चावी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्टेजवर प्रदान करण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
कायदेशीर मालकीवर वाद; न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा :
ही फॉर्च्युनर गाडी टॉप मॉडेल असून उच्च किंमतीची आहे. लग्नावेळी हगवणे कुटुंबाला “मुलीच्या सुखासाठी” म्हणून दिलेली ही गाडी आता तपासाचा भाग ठरली आहे. पोलिसांनी या गाडीचे कागदपत्र, मालकी हक्क आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील सखोलपणे तपासले आहेत. सध्या ही गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. (Vaishanvi Hagawane Death Case Update)
सदर गाडीवर सध्या कायदेशीर मालकी हक्कासंदर्भात वाद आहे. गाडी खरेदी करणारा, रजिस्ट्रेशन करणारा आणि तिला वापरणारा यामध्ये सुस्पष्टता नसल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. यावर न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती बावधन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Hagawane Fortuner Car | पोलिसांकडून सखोल तपास :
याचबरोबर, वैष्णवीच्या वडिलांनी लग्नावेळी ५० तोळे सोने, चांदीची भांडी व इतर महागड्या वस्तू हगवणे कुटुंबाला दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हुंडा प्रकरणाची गुंतागुंत अधिक गडद होत चालली आहे.
बावधन पोलीस विभागाकडून या प्रकरणात प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. वैष्णवीच्या आत्महत्येचा संबंध फक्त कौटुंबिक छळाशीच नव्हे, तर हुंड्याच्या रुपात दिल्या गेलेल्या महागड्या वस्तूंशीही जोडला जातोय. त्यामुळे न्यायप्रक्रियेला बळ देण्यासाठी पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांचे पुरावे, गाडीचा वापर व स्थानिक राजकीय सहभाग यांचाही सखोल अभ्यास सुरू आहे.






