तुझ्या पोरीला काय फुकट नांदवायचं का? मारून टाकलं; जावयाचे ते शब्द ऐकून वडील हादरले

On: May 22, 2025 6:02 PM
Vaishnavi Hagawane Case
---Advertisement---

Vaishnavi Hagavane | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane) यांच्या सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठा खळबळ उडाली आहे. मात्र, या प्रकरणातील सत्य उघडकीस आणणारी माहिती एफआयआरमध्ये समोर आली आहे, ज्यामुळे या घटनेत काहीतरी गंभीर गुन्हा दडलेला असल्याचा भास होतो.

लग्नानंतरचा छळ :

वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कस्पटे (Anil Kaspte) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीने प्रेमसंबंधातून शशांक हगवणे याच्याशी विवाह केला होता. या लग्नासाठी त्यांनी हुंड्यामध्ये ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली. मात्र, लग्नानंतर लगेचच वैष्णवीवर छळ सुरु झाला. शशांक आणि त्याचा कुटुंबीय तिला अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते, असे आरोप वडिलांनी एफआयआरमध्ये नोंदवले आहेत. (Vaishnavi Hagavane  Death)

‘फुकट नांदवायचं का?

१६ मे रोजी शशांक हगवणेने प्रणव बहिरट याला फोन करून सांगितले की, वैष्णवी आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण झाले असून, तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्यानंतर प्रणवने शशांकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन घेतला नाही. दुपारी साडेचारच्या सुमारास शशांकने प्रणवला फोन करून सांगितले की, वैष्णवीने गळफास घेतला आहे आणि ती चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे बेशुद्ध अवस्थेत आहे.

वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये तिला मृत अवस्थेत पाहिले आणि तिच्या अंगावर मारहाण करण्याच्या ठसे स्पष्ट दिसत होते. त्यांनी शशांक आणि त्याच्या वडिलांकडे याबाबत विचारले असता, त्यांनी “तुला आधीच सांगितले होते की, आम्हाला पैसे पाहिजेत, तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायची काय, म्हणून मारून टाकले तुझ्या पोरीला” असे जाणीवपूर्वक उत्तर दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.

वैष्णवीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, तिचा खून करण्यात आला आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. सध्या ह्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत  आहेत.

Title :”I killed your son!” – Vaishnavi Hagavane’s father’s heart sank after hearing his son-in-law’s words

Join WhatsApp Group

Join Now