‘शशांकमुळे वैष्णवीचं आधीच दोनदा लग्न मोडलं’, वडिलांचा गौप्यस्फोट, हगवणेंवर गंभीर आरोप!

On: May 29, 2025 7:12 PM
Vaishnavi Hagawane
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर वळण घेत आहे. हुंड्याच्या छळामुळे जीवन संपवल्याचा आरोप झाल्यानंतर आरोपी म्हणून हगवणे कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे (Anil kaspte) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप करत धक्कादायक माहिती उघड केली.

हगवणेंच्या वकिलाच्या आरोपावर उत्तर :

कोर्टात सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिचे नको त्या व्यक्तींशी चॅटिंग सुरू होते, असा दावा करत तिच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Vaishnavi Hagawane)

या दाव्यामुळे वातावरण तापले असतानाच अनिल कस्पटे यांनी स्पष्ट केलं की, मोबाईलमधील चॅटबाबत त्यांना काहीच कल्पना नाही. उलट त्यांनी हगवणेंवर उलट आरोप करत अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला.

Hagawane Family | कस्पटेंचा मोठा गौप्यस्फोट :

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल कस्पटे यांनी सांगितलं की, “वैष्णवीचं आधी दोनदा लग्न ठरलं होतं, पण हगवणे कुटुंबामुळे ते मोडलं. शेवटी नाईलाजाने वैष्णवीचं लग्न हगवणे कुटुंबात करावं लागलं.” एवढ्यावरच न थांबता, त्यांनी फॉर्च्युनर गाडी, मोबाईलच्या ईएमआयपासून निलेश चव्हाणच्या धमकीपर वर्तनापर्यंत गंभीर आरोप केले.

त्यांनी दावा केला की, “फॉर्च्युनर गाडी मी दिली नव्हती, हगवणे कुटुंबाने छळ करून ती मागितली होती. वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) नवऱ्याच्या मोबाईलचा हफ्ता आजही मी भरतो. निलेश चव्हाण या प्रकरणात सामील असून त्याने पिस्तुलाचा धाक दाखवला होता.”

या सर्व घटनांमुळे वैष्णवी प्रकरणात अजूनही नवे धक्कादायक खुलासे होत असून, पोलिस तपासाचा कक्षही आता अधिक विस्तारला जात आहे.

News Title: ‘Vaishnavi Had Two Failed Marriages Before This One,’ Says Father; Serious Allegations Against Hagawane Family

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now