Vaibhav Suryavanshi & MS Dhoni | क्रिकेट फक्त खेळ नाही, ती एक संस्कृती आहे! हे पुन्हा एकदा दिसून आलं जेव्हा राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या पाया पडला. वैभवच्या या कृतीने प्रेक्षकांचं आणि सोशल मीडियाचं मन जिंकलं आहे.
20 मे रोजी झालेल्या CSK विरुद्ध RR सामन्यानंतर पारंपरिक हस्तांदोलन होत असताना वैभव थेट धोनीच्या पायांशी वाकला. धोनीने त्याला पाठीवरून शाबासकी दिली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, क्रिकेटप्रेमी वैभवच्या संस्कारांचं कौतुक करत आहेत.
धोनीला ‘आदर’ देणारी पिढी – वैभवचा आदर्श संदेश :
सामन्यानंतर नवजोत सिंह सिधू आणि हरभजन सिंग यांच्यासोबत संवाद साधताना वैभव म्हणाला, “धोनी सर अनेकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, हेच मोठं भाग्य. ते सिनिअर आहेत, त्यांना आदर देणं हे माझं कर्तव्य होतं.”
धोनीसारख्या दिग्गजाच्या पायाला स्पर्श करून वैभवने भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं, जे आजच्या तरुण पिढीला एक शिकवण देतंय.
Vaibhav Suryavanshi & MS Dhoni | सामन्याचा थरार आणि वैभवची चमक :
राजस्थान रॉयल्सने चेन्नईने दिलेलं 188 धावांचं लक्ष्य 17.1 षटकांत पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने फटकेबाजी करत 57 धावांची जबरदस्त खेळी केली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. संजू सॅमसनने 41, यशस्वी जयस्वालने 36 आणि ध्रुव जुरेलने नाबाद 31 धावा करत सामना जिंकला.
Jurel says that’s how it’s done ????@rajasthanroyals sign off from #TATAIPL 2025 in an emphatic way ????
Updates ▶ https://t.co/hKuQlLxjIZ #CSKvRR pic.twitter.com/F5H5AbcIVu
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
ही जिंकलेली मॅच जितकी मैदानावर गाजली, तितकीच वैभवची नम्रता आणि संस्कारांची छाप देखील प्रेक्षकांच्या मनात खोलवर उमटली. वैभव सूर्यवंशीची कृती हे केवळ एका खेळाडूने सीनियरला दिलेलं आदरच नव्हे, तर भारतीय संस्कृतीची जिवंत झलक होती. क्रिकेटमध्ये भावनांचा असा ‘सिक्सर’ क्वचितच पाहायला मिळतो.






