14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी किती श्रीमंत? कमाईचे स्रोत ऐकून थक्क व्हाल!

On: August 16, 2025 1:37 PM
Vaibhav Suryavanshi Net Worth
---Advertisement---

Vaibhav Suryavanshi Net Worth | फक्त 14 वर्षांचा असूनही वैभव सूर्यवंशी हा नावाजलेला क्रिकेटपटू आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामात त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्याने गाजवलेला खेळ आणि मिळवलेली संपत्ती पाहून अनेकांना धक्का बसतोय.

वैभव बिहारचा रहिवासी असून, त्याची खेळातील प्रगती अतिशय झपाट्याने झाली आहे. IPL मधील यशानंतर तो भारताच्या 19 वर्षांखालील संघासाठी देखील चमकतो आहे. इंग्लंडमध्ये 7 सामने खेळून त्याने तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांची कमाई केली आहे. (Vaibhav Suryavanshi Net Worth)

नेट वर्थ आणि कमाईचे मुख्य स्रोत :

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती जवळजवळ 2 कोटी रुपये झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अंडर-19 संघातील प्लेइंग-11 मधील खेळाडूंना दिवसाला 20 हजार रुपये सामना शुल्क देते, ज्याचा वैभवला थेट फायदा होतो.

त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत क्रिकेट असून, त्यात IPL करार हा सर्वात मोठा घटक आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला IPL लिलावात 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय, तो रणजी ट्रॉफी आणि विनू मंकड ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये बिहार अंडर-19 संघाकडून खेळला आहे.

Vaibhav Suryavanshi Net Worth | बक्षिसांची लयलूट आणि गिफ्ट्स :

गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री यांनी वैभवला 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. IPL 18 व्या हंगामातील पदार्पणातच त्याने 7 डावांमध्ये 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या. या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला सर्वाधिक स्ट्राईक रेट पुरस्कार मिळाला, ज्यात टाटा कर्व्ह कार भेट देण्यात आली.

याशिवाय, राजस्थान रॉयल्सचे मालक रणजीत बरठाकूर यांनी वैभवच्या खेळावर खूश होऊन त्याला मर्सिडीज बेंझ कार भेट दिली. मात्र, तो अजून अल्पवयीन असल्याने सध्या स्वतः कार चालवू शकत नाही. (Vaibhav Suryavanshi Net Worth)

दरम्यान, IPL मधील यश, अंडर-19 संघातील चमकदार कामगिरी आणि वाढत असलेली नेट वर्थ पाहता, वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार मानला जात आहे. 18 वर्षांचा झाल्यावर त्याच्याकडे गाड्या चालवण्याचा परवाना आणि त्याहून मोठ्या क्रिकेट संधी असतील, यात शंका नाही.

News Title: 14-Year-Old Vaibhav Suryavanshi Net Worth, IPL Salary, Awards & Earnings Sources

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now