Urfi Javed | उर्फी जावेद नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या फॅशन्स सेन्समुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. तिच्या कपड्यांची तुलना ही इतर कोणत्याच अभिनेत्रीसोबत केली जात नाही. पापाराजी हे नेहमी उर्फीला (Urfi Javed) आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करतात. मात्र उर्फी (Urfi Javed) एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
उर्फीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
उर्फीची इन्स्टाग्राम पोस्ट पाहिल्यानंतर काही नेटकरी हैराण झाले आहेत. त्या पोस्टमध्ये उर्फीने चक्क टक्कल केल्याचा फोटो दिसत आहे. उर्फीने केलेला टक्कल पाहता नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहे. उर्फी कधी काय करेल याचा नेम नाही. मात्र उर्फी टक्कल करेल याबाबत अद्यापही कोणाला याबाबत अंदाज नाही. मात्र उर्फीच्या टक्कल असण्यावरून शंका व्यक्त केली जात होती.
उर्फीने टक्कल केलेला फोटो शेअर केला आहे. मात्र तो टक्कल केला नसून फिल्टरचा वापर केला असल्याचं बोललं जात आहे. तर तो फोटो एडीट केला असल्याचं बोललं जात आहे. बारकाईने फोटो पाहिल्यास कळतं की, उर्फीच्या खांद्यापर्यंत बारीक केस दिसतात. उर्फीने टक्कलचा फोटो शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
एका नेटकऱ्याने कमेंट केली की, फेक फोटो, दुसऱ्याने लिहिलं की, फोटो एडीट केलाय. तर तिसऱ्या नेटकऱ्याने उर्फी टकली असं लिहिलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी फिल्टर मागे केसं दिसत असल्याची कमेंट केली आहे. अनेकांनी उर्फीच्या फोटोला मानसिक अस्वस्थता असल्याची कमेंट केली आहे.
उर्फी जावेदच्या कामाबाबत बोलायचं झालं तर ती लव्ह सेक्स ओर धोका 2 या चित्रपटात ती दिसणार आहे. तिचा हा पहिलाच सिनेमा असून पाहुणी कलाकार म्हणून ती दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी उर्फीचं कौतुक केलं आहे.
‘मला उर्फी हिचा अंदाज आवडतो. ती ज्याप्रकारे कपडे घालते तिचा अंदाज मला आवडतो. उर्फी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल. मात्र एकदिवस तिला मुख्य भूमिका मिळेल, असं दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी म्हणाले आहेत.
News Title – Urfi Javed New Hair Cut Viral Photo
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं
‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले
‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण
नागरिकांची ‘त्या’ त्रासापासून होणार कायमची सुटका; सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार






