UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला सर्व्हिस राहणार बंद

On: August 2, 2024 5:04 PM
UPI users online payments service will be closed 
---Advertisement---

UPI Users | भारतासह जगभरात सध्या ऑनलाइन पेमेंट करण्याला अधिक प्राधान्य दिलं जात. यासाठी कोणतीही किचकट प्रक्रिया नाही, त्यामुळे झटपट पैशांचे व्यवहार करता येतात. कुठेही सहज पेमेंट केली जाते. त्यामुळे सध्या स्वतःकडे रोख रक्कम बाळगणाऱ्यांची  संख्या देखील कमी झाली आहे. अशात UPI द्वारे (UPI Users) पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

या 4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआयने व्यवहार करता येणार नाहीये. मात्र, हे सर्वच ग्राहकांसाठी लागू असणार नाहीये. हे फक्त HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी लागू असेल. कारण बँकेने या दिवशी शेड्यूल डाउनटाइम अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे HDFC बँकेच्या ग्राहकांना 4 ऑगस्टरोजी UPI द्वारे पेमेंट करता येणार नाहीये.

‘या’ दिवशी ऑनलाइन पेमेंट होणार नाही

मात्र, हा शेड्यूल डाउनटाइम अलर्ट फक्त काही तासांसाठी असणार आहे. त्यामुळे दिवसभर ही सेवा बंद राहणार नाही. बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, रात्री 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाणार आहे. या दरम्यान सर्व ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा बंद असणार आहे.

म्हणजेच एकूण 180 मिनिटे ही सेवा (UPI Users) बंद राहणार आहे. या काळात ग्राहकांना कोणतेही पेमेंट करता येणार नाही. याचा परिणाम बँकेच्या सर्व खातेदारांवर होणार आहे. ज्यामध्ये सेविंंग आणि करंट अकाऊंट असलेल्या लोकांचा समावेश आहे.

ग्राहकांनी काय करावे?

याचबरोबर काही ॲप्सवर देखील याचा थेट परिणाम होणार आहे. ग्राहकांना HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik वर पेमेंट करता येणार नाहीये. या काळात सिस्टीम पूर्णपणे डाऊन असेल.

बँकेचा शेड्यूल डाउनटाइम पूर्ण झाल्यावर बँक स्वतः सर्व सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना यावर काहीच करायचे नाही. मात्र, तुम्हाला नॉन-पेमेंट दरम्यान नक्कीच काही त्रास होईल. पाहायला गेलं तर, हा डाऊनटाईम नेटवर्क वाढवण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी केला जातो. सर्वच बँका (UPI Users) हा डाऊनटाईम घेतात.

News Title-  UPI users online payments service will be closed 

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

सावधान! ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी 

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चा नवा विक्रम, रुग्णांना 300 कोटीहून अधिक अर्थसहाय्य

दररोज फक्त 45 रुपयांची गुंतवणूक करा, 25 लाखांचा निधी मिळवा; जाणून घ्या योजना

‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा

Join WhatsApp Group

Join Now