‘निळा ड्रम, महिलेचे 15 तुकडे अन् लहान मुलीचा ‘तो’ फोन…’, सत्य समोर येताच पोलिसही हादरले

On: April 12, 2025 3:00 PM
up news
---Advertisement---

UP News | उत्तर प्रदेशमधील कमलगंज (Kamalganj) पोलीस स्टेशन हद्दीतील बालीपूर गावातून आलेल्या एका धक्कादायक कॉलने पोलिस प्रशासनात खळबळ उडवली. एका महिलेच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले.

पोलिसांना मिळाली हत्येची माहिती-

दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ११२ आपत्कालीन क्रमांकावर आलेल्या एका कॉलमध्ये सांगण्यात आले की एका महिलेची हत्या करून तिचे १५ तुकडे करून ते निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरून सिमेंटने बंद करण्यात आले आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांमध्ये (UP News) खळबळ उडाली. इन्स्पेक्टर राजीव कुमार (Rajeev Kumar) हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण बालीपूर गावाची झडती घेण्यात आली.

तपासादरम्यान काहीच संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी कॉल करणाऱ्याचा सीडीआर तपासून लोकेशन ट्रॅक केले. या तपासातून निष्पन्न झाले की, कॉल फतेहगड (Fatehgarh) कोतवाली अंतर्गत याकुतगंज चौकीजवळील एका गावातून आला होता. हा नंबर सफाई कर्मचारी उत्तम कुमार याचा होता.

10 वर्षांच्या मुलीचा कॉल-

या प्रकरणाचा तपास करताना एक अनपेक्षित सत्य समोर आले. पोलिसांनी चौकशी केली असता समजले की, हा कॉल उत्तम कुमार याच्या १० वर्षांच्या मुलीने केला होता. ती घरात एकटी होती आणि तिने YouTube वर एका महिलेची हत्या होऊन ड्रममध्ये शव ठेवण्याचा व्हिडीओ पाहिला होता. त्यामुळे ती घाबरून गेली आणि पोलिसांना खोटी माहिती दिली.

मुलीच्या आईने सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करत होते आणि ती घरी एकटी होती. या दरम्यानच तिने कॉल केला होता. हे समजल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

News Title – UP news Police Panic Over Murder Call

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now