One Nation One Election l देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या धोरणासंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी वन नेशन-वन इलेक्शन म्हणजे एक देश-एक निवडणुकीला मोदी मंत्रिमंडळाची मान्यता दिली होती. मात्र अशातच आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी :
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील स्वीकारल्या होत्या. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता दाट आहे.
One Nation, One Election l विधेयक कधी लागू होणार? :
मात्र हे विधेयक लागू करण्याआधी यासंदर्भात संसदीय समितीची स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. आणि त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रपती त्यावर सही करतील. तसेच त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
News Title – Union Cabinet Approves One Nation, One Election
महत्त्वाच्या बातम्या-
नवीन राजकीय समिकरणं जुळणार? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; ‘या’ विषयावर झालं बोलणं
शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ!, मित्रांसोबत बाहेर गेला आणि…
दोन्ही पवारांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? दादांनी सर्वकाही सांगितलं
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर






