Union Budget 2025: मध्यमवर्ग, गरीब आणि महिलांना मोठा दिलासा मिळणार, स्वतः मोदींनी दिले संकेत

On: January 31, 2025 4:59 PM
Union Budget 2025
---Advertisement---

Union Budget 2025 |  केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मध्यमवर्ग, गरीब आणि महिलांचा उल्लेख करत मोठ्या आर्थिक सुधारणांचे संकेत दिले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “मी देवी लक्ष्मीची प्रार्थना करतो की, गरीब आणि मध्यमवर्गीयांवर तिच्या कृपेचा वर्षाव होवो,” या शब्दांत केली. यामुळे सरकारकडून नवीन कर सवलती आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मध्यमवर्गीयांसाठी कर कपातीची शक्यता-

सध्याच्या नवीन कर (Union Budget 2025) प्रणालीत (New Tax Regime) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये:

-१५ लाख ते १८ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर २५% कर लागू होऊ शकतो.
-१८ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३०% कर भरावा लागू शकतो.
-आयकरमुक्त मर्यादा (Basic Exemption Limit) ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
-राष्ट्रीय पेन्शन योजनेतील (NPS) वैयक्तिक योगदानावर नवीन कर सवलती मिळण्याची शक्यता आहे.

हे बदल लागू झाल्यास मध्यमवर्गीयांवरील कर भार कमी होऊन त्यांच्या खर्च क्षमता वाढण्यास मदत होईल.

प्रधानमंत्री आवास योजनेचा विस्तार-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणखी तीन कोटी कुटुंबांसाठी विस्तारित केली जाईल, अशी घोषणा केली. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट-I (MIG-I) साठी परवडणारी घरे प्रदान करते. त्यामुळे अनेक कुटुंबांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत आगामी अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम जाहीर होण्याची शक्यता (Union Budget 2025) दर्शवली आहे. महिला उद्योजकता, बचत गट आणि आरोग्य योजनांसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्प 2025 मधील अपेक्षित सुधारणा-

-मध्यमवर्गीयांना कर कपात आणि NPS करसवलत मिळण्याची शक्यता.
-गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा विस्तार.
-महिलांसाठी नवीन आर्थिक आणि सामाजिक कल्याणाच्या योजना.

जर हे प्रस्तावित बदल अर्थसंकल्प 2025 मध्ये लागू झाले, तर मध्यमवर्गीय, गरीब आणि महिलांना मोठा दिलासा मिळेल.

Web Title: Union Budget 2025: Major Tax Relief for Middle Class, PMAY Expansion, and Women

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now